नायगाव तालुक्यातील रुई बु येथे कुस्त्याचा जंगी सामना गावकऱ्याच्या सहकार्याने यशस्वी झाला असून खंडोबा यात्रेच्या निमित्ताने गावकरी एकत्रित आले असल्यामुळे कुस्त्याच्या कार्यक्रमासह पालखीचा कार्यक्रम ही मोठया थाटात पार पडला असल्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करीत जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत खंडोबा रायाचा जयजयकार केला आहेतालुक्यातील रुई बु येथे दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता गावकऱ्यानी आयोजित केलेल्या कुस्त्यासाठी नांदेड बीड हिंगोली परभणी लातूर येथून कुस्त्या खेळण्यासाठी मोठं मोठाले पैलवान आले होते
आणि पैलवानाला गावकऱ्याच्या वतीने मोठा इनाम ही देण्यात आला असल्या पैलवान वर्ग समाधान व्यक्त केला यात्रेला गावकऱ्यानी एकीचे बळ ताकद दाखविल्यामुळे सर्वत्र गावात शांतता प्रस्थापित होती
रुई बु येथील सर्व समाज बांधवांना सत्तर ते ७५ च्या खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने एकत्र यावेच लागले एक म्हण आहे " गाव करेल ते राव करेल या म्हणी प्रमाणे अख गाव कुस्त्याच्या कार्यक्रमासाठी एकत्रित येऊन शांततेत कुस्त्याचा कार्यक्रम पार पडला असून सदरची ही परंपरा गेल्या अनेक वर्षा पासूनची असल्यामुळे गाव एक कोप्याने नांदण्यासाठी गावकऱ्याना हीच पद्धत कायम स्वरूपी ठेवावी लागणार भविष्यात हेच गाव एकत्र चालविण्यासाठी गावकऱ्याचा पुढाकार अतिशय महत्वाचा आहे
रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या पालकीच्या व कुस्त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार कुमरे यांच्यासह अशोक घुमे यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला आणि गावकऱ्याच्या वतीने कुंटूर पोलीस रुई बु येथील गावकऱ्याचे अभिनंदन केले तर गावकऱ्यानी कुंटूर पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे
