Header Ads Widget

नरंगल येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी गाठले नायगाव पोलीस ठाणे पोलीस प्रशासन महिलांच्या आंदोलनाने खडबडून झाले जागे ?


नायगाव :- बाळासाहेब पांडे 

नायगाव तालुक्यातील मौजे नरंगल येथे अनेक दिवसापासून अवैधरीत्या दारु विक्री होत आहे ती बंद करण्यासाठी येथील महिलांनी दि. ४ जुन रोजी नायगाव पोलीस ठाण्यात नरंगल येथील महिलांमंडळ यांनी नायगाव पो ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची भेट घेऊन अवैध दारू विक्री विषयी चर्चा करून नरंगल गावातील दारू मुक्त करावे  व्याक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले असून नरंगल ता.नायगाव येथील गावगुंड हे अनेक धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सर्रासपणे अनेक वर्षापासून सुरू चालवीत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या बळी जात आहे.
 तसेच दारु विक्री हे गल्ली बोळात जावुन करीत असल्याने दारुमुळे गावातील गोर गरीबाचे व सर्व सामान्य मजूर लोकांचे संसार उद्ववस्त होत आहेत. असे महिला मंडळांनी निवेदनात म्हंटले असून अनेक तळीराम दारुडे दारू पिऊन येथील महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत सार्वजनिक जागी महिलांचा आवमान होत असून नरंगल येथील अवैध दारू विक्री करणारे मारोती किशन केरले व शिवाजी सखाराम वाघमारे या दोघाची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार येथील महिलांच्या शिष्टमंडळांनी नायगाव पोलिसांकडे केली आहे 
स्थानिक पोलीस प्रशासनाने कार्यवाही नाही केल्यास वरिष्ठांना निवेदन देऊन आंदोलन करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा महिलांनी दिला असून तक्रारकर्त्या
महिला मध्ये सिंधुताई खुशालराव वटंबे, वंदनाबाई चंद्रकांतराव वटंबे, शोभाबाई रामराव केरले, सुशिलाबाई किशनराव वटंबे, प्रेमलाबाई सुधाकर केरले, वंदनाबाई देविदास वटंबे, संगिता नामदेव वटंबे, कुसुमबाई सुर्यकांत वटंबे, मथुरा बाई विश्वाभर जाधव, लक्ष्मीबाई वाघमारे, चौत्राबाई देशमुख, नंदाबाई करले, राज्याबाई या सह गावातील बऱ्याच महिलांनी दिली आहे.