माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सावरखेड येथे दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने झेंड्याच्या भोंवताली बांधकाम करण्यासाठी दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी बौद्ध समाजातील लोकांनी गेले असता गावचे उपसरपंच यांच्यासह दहा जणांनी दरवर्षी प्रमाणे जशी झेंड्याची पूजा करता त्याच प्रमाणे या ही वर्षी करा सदरची जागा ही ग्रामपंचायत कार्यालयाची असल्यामुळे बांधकाम करण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या दोन्ही गटाच्या हाणामारीत सुवर्णाच्या उपसरपंचासह दहा जनावर कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दलीताच्या ही दहा लोकांवर एकमेकांच्या परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याला गाल बोट लागू नये म्हणून ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी चोक बंदोबस्त ठेवला असला असल्याचे दिसून आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले गावचे उपसरपंच यांचा ही ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात समावेश असून सदरच्या घडलेल्या घटनेत गावात कसल्याच प्रकारचा सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी नांदेड येथील दंगल नियंत्रण पथकाला सावरखेड येथे पाचारण केले असले तरी सावरखेड येथे तणावपूर्ण शांतता दिसून आली असून गावात राज्य घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे जयंती सोहळ्यात काही अनुचित प्रकार घडू लागू नये म्हणून ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आणि नांदेड येथील दंगल नियंत्रणला सावरखेड पाचरण करण्यात आले आहे
सावरखेड येथे जयंतीच्या पूर्व संध्येला गावात झेंड्याचे बांधकाम करण्याच्या कारणा वरून झालेल्या हाणामारीत सुवर्णाच्या उपसरपंचासह दहा जनावर कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी गावचे उपसरपंच नारायण तुकाराम पाटील ढगे, सुरेश नारायण पाटील ढगे,संतोष नारायण पाटील ढगे, अमृता नारायण पाटील ढगे, मारोती नारायण ढगे, प्रभाकर गोविंद ढगे, बालाजी गवणाजी ढगे, त्रिंबक बालाजी ढगे, पांडुरंग बालाजी ढगे, दिलीप बालाजी ढगे,यांच्यावर कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील फिर्यादी प्रताप जळबा कदम हे आहेत तर --
सावरखेड हाणामारी प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र कदम,रावसाहेब कदम, गणेश कदम, साहेबराव कदम, मिलिंद कदम, व इतर पाच जण यांच्यावर अमृता नारायण पाटील ढगे यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कुंटूर पोलिसाशी संपर्क करून अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु व्रत लिहिजे पर्यंत अधिकची माहिती मिळू शकली नाही हे वास्तव चित्र आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सावरखेड येथे कडेकोट बंदोबस्तात उत्साहात साजरी करण्यात आली असल्यामुळे सदरच्या महामानवाच्या तैल चित्राची मिरणुक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली असून सदरच्या जयंती सोहळ्यात सर्व समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य सपोनि महादेव पुरी यांनी जयंती सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे कौतुक केले आहे
