नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नरसी ते कुंचली फाट्यावर जवळ एका कारची व ट्रकची समोरा समोर जोराची धडक लागून तीन जागीच ठार तर दोन गंबीर जखमी झाल्याची घटना काही वेळा खाली घडली असल्याने सदरच्या घटनेची रामतीर्थ पोलीसाला मिळतात तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असून सदरील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
विजय जाधव यांच्या त्यांच्या पोलीस टीमने घटनेची पाहणी करुन पंचनामा केल्याचे समजते सदरचा अपघात एवढा भयानक झाला की जागीच तीन ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अपघातात गंभीर जखनी झालेल्या दोघांना नायागांवच्या गग्रामीण रुग्णालयात पाठवून दिल्याचे समजते आहे
तालुक्यातील नरसी ते देगलूर मार्गावर असलेल्या कुंचली फाट्यावर ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील शंकरराव गंगाराम जाधव, वय ५५ वर्ष,महानंदाबाई शंकरराव जाधव वय ५२ वर्ष राहणार टाकळी (तमा ) तालुका नायगाव आणि मुलगी कल्पना शिंदे राहणार केरूर तालुका बिलोली यातील जखमीतील धनंजय जाधव, व स्वाती शिंदे राहणार --
टाकळी तमा तालुका नायागांव हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून सदरचा अपघात असा घडला देगलूर कडून नायगावकडे येणारा भरधाव ट्रक क्रमांक एपी ०३ टी ए ३१८६ या ट्रकने स्विप्ट डिझायनर कार क्रमांक एम एच २५ टी १०७५ ही कार नरसी कडून शंकर नगरकडे जात असताना हा अपघात घडला असल्याचे सपोनि विजय जाधव यांनी सांगितले आहे
