Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या आकाश पेट्रोल पंपाजवळ ट्रक मोटर सायकलच्या धडकेत सोमठाण्याचा मोटर सायकलस्वार जागीच ठार कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना •

            माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सोमठाणा येथील रहिवासी असलेल्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा ट्रक मोटार सायकलच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या आकाश पेट्रोल पंपाजवळ घडली असून हा अपघात एवढा भयानक होता की सदरच्या ठार झालेल्या मयताचे नाव गोविंदराव जयंवतराव कदम हा अंदाजे पन्नास फूट लांब ट्रक सोबत घासत गेला आणि मागील चाकाखालीच ठार झाला असल्यामुळे सदरचे प्रेत दोन्ही चाकाखाली असून अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झाली होती यात ही एक जागीच ठार होता तशाच पद्धतीची घटना कुंटूर फाट्या जवळ असलेल्या आकाश पेट्रोल पंपा जवळ घडली असल्यामुळे ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या आदेशानुसार फौजदार दिनेश येवले यांच्यासह बिट जेमादार संतोष कुमरे, पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांनी पंचनामा केला आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या आकाश पेट्रोल पंपाजवळ तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवासी हा ट्रक क्रमांक आर जे झिरो ७, जि सी ८७९५ नंबरच्या ट्रकने पाठीमागून मोटरसायकला जब्बर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सोमठाण्याचा गोविंदराव जयवंतराव कदम हा मयत लाल रंगाची विना नंबर प्लेटची मोटार सायकल घेऊन नायगाव गावाकडे जात असताना व नांदेड कडून नरसीकडे भरधाव वेगात जाणारा ट्रकने मयत हा राज्यमहामार्ग क्रॉस करताना धडक दिल्या मुळे हा इसम जागीच ठार झाला असल्याचे घटना पाहणाऱ्या लोकांनी सांगितले असून सदरचा ट्रक हा कॅरेट ट्रक मध्ये भरून घेऊन नांदेड ते नरसी मार्गांवर धावत होता असे ही अनेकांनी सांगितले असून सदरचा ट्रक हा दहा टायरी असल्याचे दिसून आले असून ठार झालेला व्यक्ती हा टायरखालीच ठार झाल्याचे दिसून येत कुंटूर पोलीस अवघ्या १५ ते २० मिनिटात घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे फौजदार दिनेश येवले यांनी ट्रकची मोटर सायकलच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले असले तरी घटना घडल्याच्या नंतर ट्रकचा चालक फरार झाल्याचे समजते मोटर सायकल स्वार हा काही तरी कामा निमित्त नायागांवकडे घरा कडून जात होता असे ही अनेकांनी सांगितले असले तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायागांव व कल्याण टोलनाक्याच्या बेजबाबदार पणामुळे येथे गतीरोधक टाकले नसल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकाचा नाहक प्राण जात असल्याचे दिसून येत असून कुंटूर फाट्या जवळ असलेले आकाश पेट्रोलपंपाकडे पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना सुद्धा मोठे अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावचे अधिकारी व कल्याण टोलनाक्याच्या ढिसाळ यंत्रनेने या ठिकाणी गती रोधक केले नसल्यामुळे अनेक अपघात होताना दिसून येत आहे