ग्रामीण भागात तळपत्या सूर्यामुळे शेतीची कामे खोळंबली मिरुग नक्षत्र येतोय जवळ शेतकरी उन्हामुळे घायाळ तर शेतकऱ्याची उन्हाळी लागवड नाही
ग्रामीण भागात व आकाशातला सुर्य तळपत असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्यामुळे शेतीची कामे मागे राहत असताना दिसून येत असून गेल्या वर्षाच्या तुलनेत पाहिले तर यंदा उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीचे काम करण्यासाठी शेतकरी घालवताना दिसून येत असून मे महिना संपल्यानंतर दिवसातच मृगनक्षत्र निघणार असल्यामुळे शेतकऱ्याला पेरणीसाठी घाई-गडबड करावी लागते परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची कामे शेतात जशास तसे असल्यामुळे शेतकरी कोणताही शेतातील मशागत पूर्ण करण्यासाठी शेतात जात नसल्याने शेतीची नांगरटी वकरटी अतिशय उन्हाच्या तीव्रतेमुळे खोळंबली असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात सूर्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सकाळपासूनच मानवाच्या अंगाची उष्णतेमुळे लाई लाई होता ना दिसून येत असून सदरचे शेतकरी शेतातील मशागत करण्याऐवजी तळपत्या सूर्याच्या उष्णतेमुळे शेतकरी अगदी घरातच बसून असल्याचे स्पष्ट चित्र खेड्यापाड्यात दिसून येत असून सदरच्या उन्हामुळे बैल सुद्धा आवता लावलेली घायाळ होताना दिसून येत असून सर्वात जास्त नायगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून गेल्या वर्षी उन्हाची तीव्रता बरीच कमी असल्यामुळे शेतकऱ्याची उन्हाळी मशागत पूर्ण करून शेतकरी पेरणी च्या प्रतीक्षेत बसला होता असेही सदरील शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे
जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी नायगाव तालुक्यात व ग्रामीण भागात भिजवनी खालचे क्षेत्र कमी प्रमाणात असल्यामुळे या तालुक्यात वाळवंटात सारखे वातावरण दिसून येते खरे तर ग्रामीण भागात उन्हाळी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांना भाव नसल्यामुळे कोणतीच पिके घेण्यास तयार नसून गेल्या दहा वर्षाखालील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बारावीच्या तळ्याच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी लागवड करत होती यात सूर्यफूल भुईमूग काराळ उन्हाळी हरभरा करडी आदी पिके घेत होती परंतु बारूळच्या तळ्याचे पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना वाटेल तेवढे पाणी सोडत नसल्यामुळे शेतकऱ्याची उन्हाळी लागवड खोळंबली जात आहे
