Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील आंतरगाव ग्रामपंचायत कार्यालयाची रणधुमाळी विधानसभा निवडणुकी पेक्षा जोरात !! सरपंच पदाचे गजानन पाटील तोडे !!

  
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे वाहनाच्या साह्याने गावातील उमेदवाराच्या प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे

शिवछत्रपती बहुजन ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून गजानन आनंदराव तोडे यांच्या व त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला वाहनाच्या माध्यमातून प्रचार चालू करण्यात आला आहे
तालुक्यातील आंतरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन तगडे पॅनल प्रमुख असल्यामुळे या सदरच्या निवडणुकीला चांगलाच रंग भरला असल्यामुळे सकाळ पासूनच प्रचाराला सुरुवात करण्यात येत असून सदरची निवडणूक अटी तटीची होताना दिसून येत आहे
---------------------------------------------------------------------
आंतरगावातील गल्ली बोळीत प्रचार टू प्रचार करण्यासाठी सरपंच पदाच्या उमेदवारासह उमेदवारांनी व त्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मुसंडी मारली असल्याने आंतरगावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत रंग चांगलाच भरला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
अंतरगाव ग्रामपंचायची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो त्यापेक्षा ही ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक जोरदार होताना दिसून येत आहे 

आंतरगाव येथे वहानाच्या सहाय्याने सदरचा प्रचार टू प्रचार होताना दिसून येत असून दोन्ही पॅनलचे पॅनल प्रमुख सरपंच पदाचे उमेदवार आणि त्यांचे नऊ उमेदवार रस्त्यावर उतरून मतदाराच्या भेटीसाठी घेत वहानावर भोंगे लावून अलाउन्समेंट करत असल्यामुळे प्रचाराला चांगलाच वेग मिळाला असल्याचे चित्र अंतरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत दिसून येत आहे