Header Ads Widget

लालवंडी येथील जेष्ठ नागरिक बाबुराव शंकरराव येरसनवार यांचे निधन अंत्यविधी आज दुपारी ३ वाजता !!


   
मारोती कोंपलवार 
ज्येष्ठ नागरिक  मनमिळावू स्वभावाचे बाबुराव शंकरराव येरसनवार यांचे हृदयविकाराने दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी पहाटे २ वाजता  वाजता निधन झाले असून ते मृत्यू समयी ६० वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान  त्यांच्या पार्थिवावर लालवंडी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंकार करण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येणार आहे

त्यांच्या पश्चात   पत्नी दोन मुले  सून नातू  असा मोठा परिवार आहे ते बी ओ आय बँकेचे मॅनेजर सुनील  येरसनवार यांचे वडील होते

असे म्हणतात की येथे जन्माला आलेल्या प्रत्येकाचा अंतही निश्चित असतो आणि हिच गोष्ट माणसाच्या आयुष्याला तितकीच लागू होते परंतु आपण आपल्या आयुष्यातील काही लोकांशी इतके जवळून जोडलेले असतो की त्यांच्या निधनाने किंवा मृत्यूने आपण खूप भावूक होतो आणि आपण त्यांना आपल्या आयुष्यात विसरणे अशक्य आहे

कोणत्याही व्यक्तीची शोकाकुल बातमी कोणासाठी ही खूप दुःखद असते हया कठीण प्रसंगी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून ईश्वर चरणी पार्थना करतो