Header Ads Widget

न्यूज रिडींग स्पर्धेत नागार्जुना पब्लिक स्कूल अव्वल स्थानी सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर



नांदेड : राजकुमार पाटील मंगनाळे - 

नांदेड येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे प्रत्येक वर्षी  न्यूज रीडिंग स्पर्धा  आयोजित केली जाते त्या अंतर्गत आज या स्पर्धेचं कुसुमताई चव्हाण सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होत नांदेड जिल्ह्यातील सर्व इंग्लिश स्कूल अंतर्गत  या स्पर्धेच आयोजन प्रत्येक वर्षी केल्या जातं वयात जिल्ह्यातील नामवंत शाळा सहभागी होतात मागील चार वर्षापासून या स्पर्धेचा आयोजन ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल करत असून या स्पर्धेत सलग तीन वर्ष नागार्जुना पब्लिक स्कूल नांदेड शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम राखल आहे 
आजादी का अमृत महोत्सव या विषयांतर्गत या स्पर्धेत समाविष्ट होत असताना नागार्जुना शाळेचे विद्यार्थी शिक्षक व प्राचार्य यांनी या स्पर्धेसाठी विविध माहितीचा पुरेपूर उपयोग करून या स्पर्धेत तनवी डोईफोडे, अनुश्री शर्मा, गार्गी भालेराव, शर्वरी बासरकर, रिद्धी अग्रवाल, आर्यन कदम, अथर्व बिराजदार, सायली वारकड या सहभागी विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान  मिळवला असून आपल्या शाळेच्या नावे विजयाची हॅट्रिक अशी नोंद केली आहे.
सदरचे यश संपादन करण्यासाठी शाळेचे शिक्षक सौ. मनीषा राजे,  मिसेस सोनिया डिसूजा, सौ. संगीता संगमकर, श्री मनोज महाजन, श्री सुब्रमण्यम दीक्षित, श्री पि. के. जाधव, श्री अरविंद संगमकर,श्री रवी सोनकांबळे, श्री मोईन खान,   आदींनी परिश्रम घेतले या यशाबद्दल शाळेचे प्राचार्या सौ.शैला पवार, संचालक श्री केशव गड्डम, प्रदीप पवार, सत्यनारायण शिवनी, राजकुमार पाटील मंगनाळे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे