नांदेड : राजकुमार पाटील मंगनाळे -
परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे या जाणिवेतून एन.सी.सी. ५२ महाराष्ट्र बटालियन च्या वतीने स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत (पुनीत सागर अभियान) नागार्जुना पब्लिक स्कूल कवठा, नांदेड व शिवाजी विद्यालय सिडको, नांदेड च्या ५३ विद्यार्थ्यांनी विष्णुपुरी काळेश्वर मंदिर देवस्थान येथे २७ ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियान राबविले.
श्रावण महिन्यात भक्तांची होणारी अलोट गर्दी व भाविक भक्तांनी व विविध व्यवसाय धारकाकडून झालेल्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर प्रांगणात व गोदावरी काठी नागार्जुना पब्लिक स्कूलचे प्राचार्य सौ.शैला पवार व संचालक केशव गड्डम यांनी आपल्या राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य याची जाणीव आपल्या शाळेतील एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना करून देऊन स्वच्छता मोहीम २७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली आहे
या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार जेमन तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपुरी चे सरपंच विलासराव हंबर्डे, काळेश्वर देवस्थानचे विश्वस्थ धारोजीराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे, सेवानिवृत्त नायब सुभेदार दत्ता काचमांडे उपस्थित होते. काळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने एनसीसी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एन.सी.सी. ५२ महाराष्ट्र बटालियनचे नायब सुभेदार रमण शर्मा, हवालदार त्रिलोक सिंग, जगत राम, संजय कुमार, नरेंद्र कुमार, जस्वीर सिंग, नागार्जुना पब्लिक स्कूल, कवठा नांदेड चे सहाय्यक एन.सी.सी. अधिकारी श्री अनिल लष्करे, शिवाजी विद्यालय सिडको, नांदेड येथील सहाय्यक एन.सी.सी. अधिकारी एस. आर. भोसीकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
नागार्जुना पब्लिक स्कूल व शिवाजी विद्यालय सिडको नांदेडच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचे या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमा बद्दल शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
