Header Ads Widget

नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गडगा ते कोपरा फाट्यावर टाटा सुमो मोटारस ायकलच्या धडकेत एक ठार एक जखमी - पोनि अभिषेक शिंदे यांची माहिती


माधव पवार / गोविंद नरसीकर - 

नायगाव तालुक्यातील मुखेड नरसी मार्गावर असलेल्या  गडगा व कोपरा फाट्यावर टाटा सुमोच्या मोटर सायकलच्या जबर धडकेत एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी माहिती दिली असून सदरील अपघातातील ठार झालेल्या व जखमी झालेल्या व्यक्तीचे नावे मिळून आले नसल्याचे पोनि शिंदे यांनी सांगितले  सदर गंभीर जखमी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे

तालुक्यातील गडगा व कोपरा दरम्यान असलेल्या फाट्यावर टाटासमो व मोटार सायकल क्रमांक एम २६ सी.बी.६५५४ आणि टाटा समो क्रमांक एम एच २९ ए डी.४१८० या वाहणाच्या अपघातात एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले परंतु जखमी व मयताचे नावे अद्याप समजू शकले नाहीत  सदरची घटना घडताच नायगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या पोलीस कर्मचारी घटना दाखल होऊन घटनेची पाहणी केले असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे