Header Ads Widget

नायगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.तिरुपती मेथे,तर सचिव पदी प्रा.माधव किन्हाळकर यांची निवड !!

नायगाव विशेष प्रतिनिधी - बाळासाहेब पांडे - 

नायगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या  अध्यक्षपदी प्रा.तिरुपती गोविंद मेथे,जनता कनिष्ठ विद्यालय नायगाव यांची तर सचिव पदी प्रा.माधव किन्हाळकर पोस्ट बेसिक मरवाळी तांडा यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे दिनांक २७ आगस्ट, शनिवार रोजी जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव बाजार येथे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या सर्व सभासदांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये  पुढील सभासदांची तालुका कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली.
नायगाव तालुका अध्यक्ष प्राध्यापक तिरुपती गोविंदराव मेथे उपाध्यक्ष प्रा.एस. एम. कवठेकर  सचिव पदी प्रा. माधव किन्हाळकर सहसचिव प्राध्यापक  एस एस शिंदे,जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक जे डी पाटील रातोळीकर, जिल्हा संघटक प्राध्यापक  जी.एस.शिंदे महिला प्रतिनिधी सौ के.यु.हटवार मॅडम यांची निवड करण्यात आली 
या मध्ये बाकी  सर्व पदाच्या निवडणुका या बिनविरोध व सर्व सहमतीने झाल्या पण पहिल्यांदाच ता.अध्यक्ष पदासाठी प्रथमच चुरशीचा सामना पार पडला. या पूर्वी गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रा.तिरुपती गोविंद मेथे जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव व पी. एच. मुदखेडे जवाहर नेहरू विद्यालय बरबडा यांच्या नावावर तालुका अध्यक्ष पदासाठी सहमती न झाल्याने  ता.अध्यक्ष पदाची निवड पुढे ढकलन्यात आली व ही निवड प्रक्रिया शनिवारी दुपारी एक ते तीन या वेळेत जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे घेण्याचे ठरले
या निवड प्रक्रियेत तालुक्यातील १०३ कनिष्ठ प्राध्यापका पैकी ९३ प्राध्यापक उपस्थित होते.त्या पैकी मेथे यांना ५९ तर मुदखेडे यांना ३४मते पडली.तर  तिरुपती मेथे हे २५ मतांनी  विजयी झाले.या निवड प्रक्रियेचे  प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर पवार गोळेगावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडले