Header Ads Widget

नांदेडच्या पोलीस अधीक्षकानी व्हाट्सअपच्या माध्यमातून अफवा करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस ठाणे प्रमुखाना दयावेत जनतेची मागणी

       माधव पवार 
नांदेड जिल्हासह ग्रामीण भागात व्हाट्सअपच्या माध्यमातून व फेसबुकच्या माध्यमातून शोशीयल मीडियाववर चोर पकडले आणि लेकर धरून नेत आहेत लेकर धारणारी टोळी पकडली असी मोठया प्रमाणात अफवा पसरवित असल्यामुळे त्यांच्याकडे जिल्हाचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लक्ष घालून अफवा पसरविणाऱ्यावर कोणती ही ऑक्सन घेत नसल्यामुळे अफवाला मोठया प्रमाणात उत्त आला असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश देतील का ? असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे
ग्रामीण भागात व खेड्यापाखेड्यात रिकाम टेकडे लोक विनाकारण कारण चोऱ्या होत असल्याचे लेकर पकडून नेत असल्याच्या अफवा करीत आहेत त्यामुळे महिला वर्गात व लहान मुलात भीतीचे बातावरण पसरले असून हा अफवाचा पाऊस गेल्या आठ दिवसा पासून खेड्यापाड्यात मोठया प्रमाणात पसरविली जात असल्यामुळे असा प्रकार कोठे होत नसताना रिकाम टेकडे हे सदरचे काम शोशीयल मीडियाच्या माध्यमातून केल्या जात असल्यामुळे जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जास्तीचे लक्ष देण्याची गरज भासत आहे
 
अशा पोस्ट टाकून केली जाते शोशीयल मीडियावर अफवा -

चोऱ्या होणाऱ्या ह्या शहरी भागासह ग्रामीण भागात नवीन नाही परंतु उगीच चर्चा लेकर पकडून घेऊन गेले आहेत लेकर पकडून नेणारी चोरी पकडली आताची चोरी झाली असे अनेक मॅसेज व्हाट्सअप ग्रुपवर वर फिरत असल्यामुळे त्यांचा फटका महिलाना बसत असून महिला वर्ग कामे करण्यासाठी शेतात जाण्यासाठी धजावत नसल्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून चोऱ्या करणाऱ्या लोकांना जेरबंद करण्यासाठी नांदेड पोलीस सक्षम असताना सुद्धा खोट्या अफवा केल्या जात असताना सुद्धा पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी लक्ष देत नाहीत असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे