सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार असी चर्चा गेल्या काही वर्षा पासून केली जात होती परंतु सदरचा रस्ता कागदावरच असल्यामुळे अनेक वेळा निधी रस्त्यासाठी आल्याच्या अफवा ही करण्यात आल्या नायगाव विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन माजी आमदार विद्यमान वसंतराव चव्हाण यांनी आमदार असताना घुंगराळा येथे रस्त्याचे उदघाटन करण्यात आले होते
परंतु रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही त्या पाठोपाठ याच विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून राजेश पवार यांनी रस्ता दुरुस्त व डांबरी करण्यासाठी तेरा कोठी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असल्याची चर्चा आहे
ग्रामीण भागात होताना ऐकावयास मिळत असली तरी निधी प्राप्त झाला असेल तर काम करण्यासाठी गुत्तेदार मिळत नाही का असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात असताना ऐकावयास मिळत असून काही लोकातुन असी चर्चा केली जाते की सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी गुत्तेदार मिळत नाही म्हणून काम थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असून खरच घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी तेरा कोठी रुपये निधी मंजूर झाली का ? असा प्रश्न केला जात आहे
असून सोशियल मीडियाच्या माध्यमातून निवेदन दिलेले पत्र वायरल होताना दिसून आले आणि रस्ता अद्याप तरी मार्गी लागला नसल्यामुळे या रस्त्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी अथवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या लपडयात असलेल्या रस्त्याची लवकर दुरुस्ती करण्यात यावी असी मागणी जोर धरित आहे
