मधुकर जवळे / मारोती कोपलंवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन शाखा अधिकारी एम आर हंगरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ सप्टेंबर २०२२ रोजी कोकलेगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वाह्य व पेना वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच कार्यक्रमात शाळेत वृक्षारोपणाच्या ही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरचा कार्यक्रम हा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहितीvगंगाधर रुक्कमाजी हंगरगे, गिरीधर पाटील घारके यांनी हंगरगे यांनी दिली आहे
याच कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे
तालुक्यातील कोकलेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे माजी शाखा अधिकारी एम आर हंगरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व त्यांच्या डोळस विचारातून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या जिल्हा परिषद शाळेत एकवीस वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याने वृक्ष लागवडीचा संदेश हा सदरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला जात आहे सदरील कार्यक्रमाला गावातील गजानन पाटील जुन्ने,गावच्या विद्यमान सौ सरपंच प्रतिनिधी हणमंतराव मिरकुटे,ॲड ज्ञानेश्वर मोरे, लव्हाजी नारे, काळबा पाटील या विशेष मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत
