Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २८ तर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ आणि नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रास ११ गणरायासाठी ऑनलाईन नोंदणी -

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण पंचेचाळीस गावे असल्यामुळे सदरील गावात गणरायाची स्थापना करण्यासाठी एक ऑनलाईन अर्ज अधिकृत रजिस्ट्रेशन करण्यात आले असल्याची माहिती ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे अभिजित पाटील यांनी सदरची माहिती दिली असून आदीचे ऑनलाईन अर्ज प्राप्त होणार असल्यामुळे सदरच्या गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुंटूर पोलीस ठाणे सक्षम असल्याचे ही शाखेचे अभिजित पाटील यांनी माहिती दिली असून कुंटूर हद्दीत एकूण श्रीगणेशाच्या स्थापनेसाठी २८ आर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत
नायगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण पस्तीस गावे आहेत या सदरच्या हद्दीत आत्तापर्यंत मंगलमूर्तीच्या स्थापनेसाठी ऑनलाइन रजिस्टेशन अर्ज एकूण ११ प्राप्त झाले असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली असून ठाण्याच्या अंतर्गत मोठया प्रमाणात गणरायाच्या मंगलमुर्त्या बसविल्या जाणार असल्याची ही माहिती पोनि शिंदे यांनी दिली असून गणेशोत्सव काळात कुठे ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नायगाव पोलीस लक्ष ठेवून असल्याचे ही ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले सदर चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन नायगाव ठाण्यात प्राप्त होतील अशी अपेक्षा  पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नायगाव फास्ट न्युजशी बोलताना व्यक्त केली आहे
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण पंचेचाळीस गावे आहेत या ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५ गावांत सिद्धिविनायकाच्या मुर्त्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गणेश मंडळाने बसविणार असल्यामुळे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी सदरच्या गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांचे लक्ष असल्याचे ही सांगितले असून सदरचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नायगाव पोलीस ठाण्यासह कुंटूर, रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत नायगाव तालुक्यात गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात व फटाक्याची अतिषबाजी करून मंडळाच्या ठिकाणी नेल्या जात आहे