कायम गट शिक्षणाधिकारी पदाचे
केंव्हा सुटेल कोडे ?
नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
नायगाव प.स.प्रभारी गट शिक्षणाधिकारी पदी एम. जे. कदम विस्तार अधिकारी धर्माबाद यांनी प्रभारी गट शिक्षणाधिकारी फटाले कडील पदभार स्वीकारला आहे.नायगाव पंचायत समितीत अनेक दिवस काम केलेल्या कदम यांना हा पदभार दिल्या मुळे नायगाव तालुक्याचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडे पदभार देण्यात आला आहे अशी चर्चा सर्वत्र आहे.प्रभारी चा पदभार प्रभारीकडे च देण्यात आपण नायगाव प.स.कायम गट शिक्षणाधिकारी पदाचे केंव्हा सुटेल कोडे सुटणार या विषयी शिक्षण प्रेमीत चर्चा होत आहे.
नायगाव पंचायत समितीला गेल्या अनेक दिवसा पासून प्रभारीच गट शिक्षणाधिकारी असून आता पर्यंत कोउठकर मैडम, अशोक पवळे,नंतर फटाले यांनी पदभार घेतला होता या नंतर पुन्हा एकदा प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून एम. जे. कदम विस्तार अधिकारी धर्माबाद यांच्या कडे पदभार देण्यात आला आहे.त्यांनी ३० ऑगस्ट २०२२ मंगळवार रोजी पदभार स्वीकारला आहे.एम .जे.कदम हे या पूर्वी नायगाव येथे शिक्षक ,केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते.परवा त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी धर्माबाद येथे पदोन्नतीने बदली झाली.धर्मबाद येथे रुजू झाल्या नंतर त्यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार दिल्याने नायगाव चा पूर्ण अनुभव असलेले अधिकारी म्हणून अशोक पवळे नंतर ते राहणार आहेत.
नायगाव येथे गेल्या अनेक दिवसा पासून कायम स्वरूपी गट शिक्षणाधिकारी येण्यास कोण्हीच तयार नाही.त्या मुळे प्रभारी वरच भार टाकले जात आहे.या तील काहींनी जिद्दीने पदाचा भार आपल्या खांद्यावर घेत प.स.च्या शिक्षण विभागाचा गाडा हाकला आहे. काही आवडीने पदभार घेत होते तर काहींना संधी येऊन ही नको रे बाबा हा पदभार म्हणीत टाळाटाळ करीत होते या मुळे मधल्या काळात विणा गट शिक्षणाधिकारी नायगाव प.स.च्या शिक्षण विभागाचा कारभार राम भरोसे चालला शिक्षकांना उपास मारीची वेळ ही आली.परंतु पदभार च का होईना तोघेतल्याने तूर्तास प्रश्न मार्गी लागतील असे दिसून येते.
