नायगाव विशेष प्रतिनिधी - बाळासाहेब पांडे -
नायगाव शहरात बुधवारी दुपारी गणेश उस्तव व दुर्गा उस्तव च्या पर्शवभूमीवर नायगाव पोलिसांनी मुख्य रस्त्यावर पथ संचलन करीत गणेश भक्त व नागरिकांना सण उस्तव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व सपोनि शिवराज बाचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसाचे पथसंचालन करण्यात आले आहे
पोलीस ठाणे,शिवाजी चौक नगर पंचायत, जुना सराफा मार्केट,मार्कडे मंदिर,कन्या शाळा,नेताजी सुभाष चन्द्र बोस चौकफुले कॉलनी,बसस्थानक,डाँ हेडगेवार चौक,ग्रामीण रुग्णालय मार्ग या मुख्य रस्त्यावरून हे पथ संचनल करण्यात आले
या संचलनाच्या वेळी पोलीस गाडी मध्ये माईक लावून आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या.पोलीस जमादार,पोलीस शिपाई होमगार्ड,अधिकारी कर्मचारी असे ७० च्यावर पोलीस कर्मचारी हजर होते.जनतेनी आपले सण उस्तव शांततेत व पोलीस कर्मचारी याना सहकार्य करीत नियमाचे पालन करीत करावेत असे आव्हाहन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले.जे कोण्ही कायदा हातात घेईल त्या साठी आम्हाला वेगळा बंदोबस्त करणे भाग पडणार आहे असे त्यांनी सांगितले.
