माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर व बरबडा येते गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला पोलिसाचे दमदार पथसंचलन करण्यात आले सदरच्या पथसंचलनात पोलीस अधिकारी व ठाण्याचे पोलीस कर्मचारी सदरच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व राहण्यासाठी दरवर्षी कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने पथसंचलन करण्यात येते ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या आदेशानुसार गावातील मुख्य रस्त्याने मोठा पोलीस फौज फाटा यांच्या माध्यमातून पथसंचलन करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक सुचनेनुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी आपल्या ठाण्याचा पोलीस फौज फाटा घेऊन दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दमदार पथसंचालन केले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले फौजदार संजय अटकोरे यांच्यासह संबंधित बीटचे पोलीस जेमादार व पोलीस कर्मचारी यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावातील म्हणजे प्रॉपर कुंटूर आणि बरबडा या महत्त्वपूर्ण गावांमध्ये कुंटूर पोलिसांचं पथसंचलन पोलीस फौज फाटा घेऊन मोठ्या दमदार पद्धतीने थाटात करण्यात आले ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना गणेश उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित टिकून ठेवण्यासाठी एकदम ओके लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत
