Header Ads Widget

अर्धापूर तालुक्याच्या प्रचार्याचा मृतदेह बारूळ येथून पुराच्या पाण्यात वाहून आल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काहाळा येथे सार्वजनिक विहिरी जवळील ओढ्यात सापडला


 माधव पवार : किरण हाणमंते 

आर्धापूर तालुक्यातील लहान लोन येथील रहिवासी असलेल्या व हल्ली मुक्काम बारूळ येथे राहत असलेल्या आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज विष्णूपुरी नांदेड येथे कार्यरत असलेले मयत प्रचार्य अंकुश हरिचंद्र सावंत वय ३५ वर्ष राहणार लहान लोन यांचा मृतदह कंधार तालुक्यातील बारूळ येथून दिनांक ९ जुलै २०२२ रोजी पुराच्या पाण्यात वाहून आल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा खुर्द येथील ओढ्यात असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी जवळ दिनांक ११ जुलै २०२२ रोजी दुपारी दोन तीन वाजण्याच्या दरम्यान आढळून आला सदरील घटनेची कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांना कळताच बरबडा बिटचे जेमादार निखते यांच्या मार्गदर्शनाखाली एल एम सोनकांबळे, व एस एम कंधारे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे
अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड येथील लहान लोनचा रहिवासी मयत तरुण प्रचार्य अंकुश हरिचंद्र सावंत यांची पत्नी पेटवडज येथे सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत असल्यामुळे तो मयत बारूळ येथे राहत होता परंतु दिनांक नऊ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाले तुडुंब भरले होते नाल्याना मोठा पूर आला होता पुराच्या पाण्याचा अंदाज प्रवास करताना लागला नसल्यामुळे मयत अंकुश हरिचंद्र सांवत यांनी मोटार सायकल क्रमांक एम एच २६ / जी ६९७ वर जात असताना पुरात वाहून गेला असल्यामुळे मोटार सायकल उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्यामुळे ठाण्याचे बिट जेमादार जामकर यांनी त्यांच्या नातेवाईकाना संपर्क करून माहिती दिल्यामुळे मयताचा शोध तीन दिवसा पासून घेत होते अखेर कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयताचा मृतदेह काहाळा खुर्द येथील ओढ्यात असलेल्या सार्वजनिक विहिरी जवळ सापडला आहे