Header Ads Widget

संडाससाठी बाहेर गेलेल्या पिंपळगावच्या तरुणांनाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू नायागांव पोलीस ठाण्याच्या हदीतील घटना -

 


नायागांव फास्ट न्यूज : विश्वाभंर वन्ने :

नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व नायागांव व पिंपळगाव या गावाच्या मध्यभागातून एक ओढा वाहत असते या ओढ्यालाच्या काठावर संडास करण्यासाठी गेलेल्या पिंपळगावच्या तरुणांनाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ११ जुलै २०२२ रोजी उघडकीस आली असल्यामुळे नायगावचे पोलीस घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून सदरची घटना दिनांक १० जुलै रोजी सकाळी ११ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे कळते पुरात वाहून गेलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी गावचे सरपंच किरण कदम यांच्यासह गावकऱ्याना व शेख गौस यांना कमालीची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे
"
पिपंळगाव ते शेळगाव पर्यंत सर्व नदी काठावर गळ फिरवून शोध मोहीम चालूच ठेवली दुपारी पावणे एकच्या दरम्यान पिपळगाव येथील जुनी पाण्याची टाकी जवळ सदर प्रेत गळाला  लागल्या नंतर मोठ्या शिताफीने प्रेत पाण्यातून बाहेर काढून नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.यां कामी शेळगाव सजाचे तलाठी यांनी पंचनामा करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला
फिर्यादी पोचीराम मालु गायकवाड वय ५५ वर्ष व्यवसाय शेती. मैदा चा सासरा. राहणार पिंपळगाव तालुका नायगाव खै. मयत लक्ष्‍मण पिराजी  गोंडाळे. वय ३५ वर्षे व्यवसाय मजुरी  राहणार पिंपळगाव येथून ओढ्याच्या काठी गेला होता. परंतु घरी वापस आला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली नायगाव येथील मुस्लीम समाजाच्या समशान भूमी लगत ओढ्यात पाण्यात वाहून जावून बुडून मरण पावला. अशी खबर दिल्याने नायगाव पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया चालु होती. या घटनेचा तपास. नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाचावर  यांच्या मार्गदर्शनाखाली. साई सांगवीकर हे पुढील तपास करीत आहेत.