नायगाव फास्ट न्यून :- सय्यद कलीम : पूर्णा :
स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या पूर्णा शहरात बिनधास्त पणे अवैध धंदे सुरू असल्यामुळे या अवैध धंद्यावर परभणी येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पूर्णा येथील मटका जुगार घेनाऱ्यावर धाड टाकून दोघा जनावर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यामुळे सदरची धाड स्थानिक पोलिस प्रशासनच्या उरावर येऊन मारली असल्याचे चर्चा होत असली तरी पूर्णा तालुक्यासह शहरात बिनधास्त पणे जुगार अड्डे ,मटका,गुटखा विक्री आदी अवैध धंदे मोठया झपाट्याने सुरू झाले असल्याचे सांगण्यात येत असून
याकडे स्थानिक पोलीसानी दुर्लक्ष केल्याने सदरचे अवैध अवैध धंदे वर डोके काढले आहे
पूर्णा शहरात मटका घेणारे बालाजी ऐगडे,दुलहे खान पठाण,अंकुश खुणे या तिघांना विरोधात गुन्हे अन्वेषण विभागाचे बाळासाहेब तुपसूमदरेच्या तक्रारी वरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हे अन्वेषण विभाग परभणी येथून येऊन पूर्णेत धाड टाकल्याने स्थानिक पोलिसांचा ना विलाज झाला असून परभणीचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी लक्ष द्यावी अशी मागणी पुढें येत आहे
सदरचे अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने तर चालत नाही ना आता प्रश्न केला जात असून इतकेच नव्हे या अवैध धंद्याची वसुली दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मार्फत केल्या जाते असा आरोप सुद्धा केला जात
असल्याची चर्चा ही ऐकावयांस मिळत आहे.मात्र पूर्णेत सुरू असलेल्या अवैध धंद्याची चुणूक परभणीच्या गुन्हे अन्वेषण विभागाला लागल्यामुळे दिनांक ११ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन ते साडे तीनच्या दरम्यान पूर्णा
शहरातील सिद्धांर्थ नगर परिसरात कल्याण मिलन नावाचा मटका घेणाऱ्या दुकानावर धाड टाकून मटका जुगाराचे साहित्य व दोन मोबाईल आणि नगदी मिळून आलेले बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे
