Header Ads Widget

रोजगार हमी योजनेतील देयके काढणा-या कर्मचा-याची ड्युटी टालमटोला लाभार्थीसह शेतकरी मारतात चकरा, पंचायत समितीच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला

नायगाव फास्ट न्यूज : सय्यद कलीम पूर्णा 

पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षातील कर्मचारी हे टालमटोला ड्युटी करीत असून कार्यालयात वेळेवर हजर न राहता मनमानी पध्दतीने कोणत्याही वेळी उशीर येत आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर व अन्य कामे केलेले लाभार्थी शेतकरी देयके मिळण्यासाठी चकरा मारुन परेशान आहेत. या पूर्वी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सर्व कर्मचा-यांनी आपापल्या टेबलवर वेळेत नियमित हजर रहावे तसेच बाहेर गावाहून येणे जाणे न करता मुख्यालयीच राहून नागरीकांची कामे ताबडतोब करण्याचे आदेश दिले होते
सदरील कर्मचारी यांनी लाखो रुपये वसूल केले असल्याचा आरोप करीत सदरील तक्रार 
 लाभार्थी शेतकरी बोलून दाखवत आहेत तरी ही गटविकास अधिकारी या कर्मचा-याची पाठराखण करीत असल्याने भ्रष्टाचार करणा-या या दोन्ही कर्मचारी यांची तात्काळ बदली करण्यात येणार असल्याचे सुत्र सांगत आहेत. तसेच येथील निष्क्रिय असलेल्या तहसीलदार यांचीही बदली होणार असल्याचे बोलले जात आहे

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे कोणताच कर्मचारी वेळेत उपस्थित न राहता दुपारी कार्यालयात येत आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि रोजगार हमी कक्षातील कर्मचारी यांच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तसेच रोजगार हमी योजनेचे बिले मजूर पेमेंट काढण्यासाठी हा कर्मचारी टक्केवारी घेऊन आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. अनेक शेतक-याचा विहीरीचे खोदकाम बांधकाम पूर्ण होवून शुध्दा त्याचे आनूदान पैसे दिल्याशिवाय हा कर्मचारी मस्टर काढीत नाही.