Header Ads Widget

मांजरम-बेंद्री रस्त्यावर मोठा खड्डा, पूल तुटला म वाहतूक खोळबंली,तालुक्याचा संपर्क बंद सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष


नायगाव : बाळासाहेब पांडे 

मांजरम ते बेंद्री मार्गावर परवा झालेल्या मुसळधार व संततधार पावसामध्ये पुलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे वाहून गेलाआहे. यामुळे या पुलावर भल्ला मोठा खड्डा पडला आहे. सध्या या पुलावरून चार चाकी व तीन चाकी वाहतूक बंद झाली असून  या खड्डड्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणावे तेवढे लक्ष देत नसल्याने मांजरमकर नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्या साठी इतर मार्गाचा आवलंब करावा लागत आहे.
 
दोन वर्षांपूर्वी  याच पुलावर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. असे असतानाही याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा त्वरीत बुजवावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील तरुणांनी दिला आहे.
मांजरम-बेंद्री - नायगाव हा रस्ता तालुक्याला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर मांजरम ते बेंद्री दरम्यान पूल आहे. या नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या माणात असतो. अनेक वेळा येथे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे तो खड्डा अपघाताला निमंत्रण असून तो खड्डा बुजवावा, अशी मागणी या भागातील तरुणांनी केली आहे. काही देवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत या पुलाचा बराच भाग वाहून गेला आहे

पुलाला पुरसन अडकल्याने पुराचे पाणी पुलावरून गेले व बाजूच्या शेतात पाणीशिरल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुलावर भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा कुणीच बुजविण्यास तयार नाही हा खड्डा दिवसेंदिवस मोठा होत असून पावसामुळे हा खड्डा अजून खचून जावून रस्ता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा खड्डा बुजविल नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे बांधकाम विभागाने हा खड्डा त्वरीत बुजवावा, अशी मागणी जोर धरत आहे.