नायगाव फास्ट न्यूज : थेट भिवंडी :
. माधव पवार
मानव धर्मातील एका तळीराम दारुड्या पित्यानीच आपल्या आपले रक्तताचे नाते बाजूला ठेवत आपल्या स्वतःच्याच अंदाजे दहा ते आकारा वर्षाच्या पोटच्या गोळयावर अर्थात स्वतःच्या मुलीवर शारिरीक अत्याचार करुन तिचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली असली तरी सर्वत्र या भागात हळहळ व्यक्त केली जात असून अशा दारूडया आत्याचारी बापास पोलिसांनी तात्काळ बेडया ठोकुन जरबंद केले असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीत सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या मुलीवर आत्याचार करण्यात आला असल्यामुळे ही सदर घटना मानवतेला काळिमा फसणारी असून ही मुलगी आपल्या आई वडिला सोबत राहत होती असे सांगण्यात येते
मुलीला रुग्णालयात घेऊन गेले असता ती मृत असल्याचे डॉक्टरानी सांगितले या घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन ते अडीच सर्व परिसरात शोध माहीम चालू केली सदरचा दारूडया बाप सदरचे कृत्य करुन फरारअसलेल्या आरोपीस पकडून ताब्यात घेतले ठाणे न्यायालयात आरोपी पित्यास पोलिसांनी हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे
या बेवड्या तळीरामाला मोठे दारूचे व्यसन होते सदर बेवडा आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणारा होता आणि घरीच बसून आयत खात असल्याचे सांगण्यात येते त्या बेवड्या पत्नी ही माय मावली मानकोली येथे गोदामात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होती सदरच्या मुलीची आई नेहमी प्रमाणे दिनांक १४ जुलै २०२२ रोज गुरुवारी पोटाच्या खळगीसाठी कामाला गेली होती घरी मुलगी व बेवड्या बाप असे दोघेच होते सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान सदरच्या मुलीची माता घरी आली असतानाचा तिच्या नजरेस दाराला कडी लावलेली दिसून आली सदरचे दार उघडले असता सदरची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले आईचे काळीज ना थांबता आरडा ओरड करत असल्याने आजू बाजूचे लोक जमा केले
