. मधुकर जवळे
नायगाव, पिंपळगाव, नायगाव वाडी अशा तीन गावांची एकत्रित असलेल्या नायगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रदीप पाटील कल्याण, तर व्हॉइस चेअरमन पदी दि.15 जुलै रोजी बिनविरोध फेरनिवड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करण्यात आल्याची माहिती निवडणुक पिटासीन अधिकारी बी सी. पवार यांनी दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव, पिंपळगाव, व नायगाव वाडी अशी मिळून तीन गावाची एकत्रीत गट सेवा सहकारी सोसायटी असलेल्या सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच जून महिन्यात बिनविरोध पार पडली होती
या बिनविरोध आलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सह त्यांचे बंधू श्रीनिवास पाटील चव्हाण, व माधवराव बेळगे, श्रीनिवास चव्हाण, माजी चेअरमन प्रदीप कल्याण, किशन बोमनाळे, बाबूराव चव्हाण, बालाजी लखपत्रेवार, गंगाधर मदेवाड, दिगांबर भालेराव, व्यंकटराव माने, पठाण मनुवरखॉ, सुंदरबाई शिंदे, भारतबाई शिंदे या संचालकाचा समावेश आहे.माजी आमदार वसंतराव चव्हाणयांच्या नेतृत्वाखालील सोसायटीच्या चेअरमन पदी त्यांच्याच मर्जीतील विश्वासूअसलेले माजी चेअरमन प्रदीप पाटील कल्याण, यांच्या चेअरमन निवडी करिता सूचक माधवराव ईश्वरराव बेळगे यांनी नाव सुचविले तर अनुमोदन दिगंबर शंकरराव भालेराव यांनी दिले.
तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सूचक श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण यांनी नाव सुचविले तर अनुमोदन मूनवरखां मस्तानखा पठाण यांनी दिले. यांचे विरोधात दुसरा एकही अर्ज आला नसल्यामुळे त्यांच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी ठराव सर्वानुमते संमत करून त्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्याची माहिती निवडणूक पिटासीन अधिकारी बी. सी. पवार यांनी दिली त्यांना या निवाडीकरिता सेवा सहकारी सोसायटी चे सचिव एस.एल.करकेले, एन.व्ही. गादेवार यांनी मदत केली. त्यांच्या निवडी नंतर उपस्थित माजी आ. वसंत चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे, सर्व संचालक सभासदांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
