. माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नांदेड दौऱ्यावर आले असताना हभप अरविंद जी महाराज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस धार्मिक व सांस्कृतिक आघाडी मराठवाडा प्रमुख यांनी कलावंतांचे मानधन तत्काळ वाढीव मिळावे म्हणून आणि जिल्ह्यात मुसळधार पावासाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात अतोनात नुकसान झाले असल्यामुळे त्यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी पन्नास हाजार रुपये देण्यात यावे या मागणीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयवंत पाटील यांना अरविंद महाराज सोनखेडेकर यांनी निवेदन दिले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, राष्ट्रवादी,डॉक्टर सुनील कदम शहराध्यक्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष भोसीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाठ बडूरे यासह साहित्यिक व ज्येष्ठ कलावंत मंडळी यावेळी उपस्थित होते
जिल्ह्यासह तालूक्या तालुक्यातील खेड्यापाड्याती शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रशासनानी करून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करण्यात यावी व हेक्टरी पन्नास हजार रुपये व विमा लागू करण्यात या या संदर्भात सरकारकडे मागणी करावी या अनुषंगाने ह भ प अरविंद जी महाराज मोरे सोनखेडेकर राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयवंत पाटील यांची नांदेड दौऱ्यावर आले असता भेट घेऊन अनेक विषयावर सविस्तर चर्चा केली व निवेदच्या स्वरूपात महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी कलावंत ही मोठया संख्येने उपस्थित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जलसंपदा मंत्री जयवंत पाटील यांना निवेदन अरविंद महाराज सोनखेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे
