माधव पवार
नायगाव तालुक्यातील अनेक रस्त्याची विल्हेवाट लागली असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावचे उप अभियंता यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या विभागा अंतर्गत असलेले रस्त्याची बे अवस्था झाली असताना ही अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे असी रस्त्याची वाट लागली तर नायगाव, शेळगाव छत्री, कोकलेगाव, कुंटूर, मार्गे बळेगाव, सातेगाव, उमरी जाणाऱ्या रस्त्याची व कोकलेगाव येथील ओढ्याची गेल्या अनेक वर्षा पासून चांगलीच विल्हेवाट लागली असताना या विभागाचे काय पुढारी अन काय अधिकारी असी म्हण्याची वेळ परिसरातील जनतेवर आली असून या रस्त्या वरून जाणाऱ्या वाहतूकीची जनसामान्य माणसाला काय यातना होत असतील हे जाणून घेणे गरजेचे आहे
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह राजकीय पुढाऱ्याचा बेजबाबदार पणा तर सा.बा उपविभाग नायागांवच्या उपअभियंत्याचा हलगर्जी आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकलेगावच्या ओढ्यातील पुलाची व रस्त्याची बिकट अवस्था झाल्याचे चित्र अधिकाऱ्या समोर असताना सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे अधिकाऱ्यानी व राजकीय पुढाऱ्यानी आत्मपरीक्षण करण्याची गरज भासत असून सदरच्या कोकलेगाव येथील ओढ्यातील पूल हा गुत्तेदाराच्या मनमानीमुळे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने सदरच्या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी विलंब लागत आहे
सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव व उपअभियंता यांनी वेळीच रस्त्याकडे व कोकलेगाव येथील पुलाकडे लक्ष दिले असते तर रस्त्याची बिकट अवस्था झालीच नसती गेल्या अनेक वर्षा पासून कोकलेगाव येथील ओढ्यातील होत नसल्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व गुत्तेदार रिकामा वेळ मारून नेले आहेत सदरच्या पुला जवळ आंदाजे दोन ते तीन फूट खोलीचे खडे पडले असताना बे फिकीर अधिकारी बेजबाबदार पुढारी असी म्हण्याची वेळ जनतेवर आली असताना सुद्धा कोणता ही नेता अथवा अधिकारी या कोकलेगावच्या ओढ्यातील पुलाकडे डोळा ही उचलून व हुंगून ही बघत नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
