Header Ads Widget

बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या तहसीलदार गजानन शिंदे यांनी ग्रामीण भागासह ग्रामीण भागात पुर परिस्थितीची शेतीच्या नुकसानीची केली पाहणी --


.      माधव पवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या दिनांक ७ जुलै २०२२ रोजी पासून मुसळधार पावसाने धुमाकूळ माजवून पूर परिस्थिती निर्माण झाली या पूर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी तालुक्यातील पाहणी केली आणि दिनांक १५ जुलै २०२२ रोजी बरबडा विभागात व रुई परिसरात प्रशासकीय दौरा करून शेतकऱ्यांच्या पिका बरोबर पूर परिस्थितीचा आढावा घेतला सदरचा घेतलेला आढावा उपविभागीय अधिकारी गिरी यांना लवकर सदरचा आवाहाल सदर करतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह जनतेनी व्यक्त केली असून या परिसरात शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे
".                   ".                     ".                        ".  
उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्यासह नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी राहेर व बरबडा रुई बु घुंगराळा आणि सातेगाव,बळेगाव विभागतील व परिसरातील पुर परिस्थितीची प्रार्थमिक पाहणी केली या पाहणीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व पुराने अतोनात नुकसान झालेली थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे 
तालुक्यातील बरबडा व रुई बु परिसरात नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सुद्धा पूर परिस्थिती व शेतीचे झालेले नुकसान याच परिसरातील पाझर तलावाची पाहणी केली सदरचे पाझर तलाव सावरखेड, रुई बु, घुंगराळा, कृष्णूर येथील एक कुंटूरकर शुगर कारखाना येथील एका तलावाची पाहणी केली त्याच बरोबर तहसीलदार यांनी राहेर येथील गोदावरी पुलाची व या भागातील शेतीची आणि पूरपरिस्थितीची पाहणी केले असल्याचे वास्तव चित्र असून दिनांक १५ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी मंडळ अधिकारी व तलाठी आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोबत घेऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे