नायगाव : मधुकर जवळे :
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात दारू बंदी अधिकारी बिलोली यांच्या आशिर्वादामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर जिथे पाहावे तिथे देशी विदेशी दारू विक्री होत असताना सुद्धा सदरचे दारू बंदी अधिकारी अध्याप कारवाई करीत नसल्यामुळे संबंधित पोलिसांनाच अवैध धंद्याला आळा बसावा म्हणून कारवाई करावी लागते परंतु दारू बंदीचे अधिकारी दर महिन्याच्या वरमाईत मग्न असल्यामुळे त्यांना दारू बंदीचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत असून दारू बंदी कायदा आणि दारू बंदी अधिकारी बिलोली हे नावाच असल्याचे दिसून येत असून बिलोलीचे दारू बंदी अधिकारी दर महिन्याला मात्र आपले काम फत्ते करून जाताना दिसून येत आहे
: वरिष्ठ अधिकारीच झाले थंड ? तर मग संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना काय घम !
तालुक्यात रेती व मुरूम सर्व रॉयल्टी बंद असताना सुद्धा एवढ्या मोठया प्रमाणात रेती येते तरी कुठून असा प्रश्न पडला असला तरी गेल्या उन्हाळा भरात औद्योगिक वसाहत कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी धारकांनी नवीन बांधकाम करीत असताना या ठिकाणी सुद्धा मोठया प्रमाणात रेतीचे साठे दिसून आले सदरील कंपनीत लागणारा मुरूम सुद्धा टाकण्यात आला हा महसूल प्रशासनाला अंधारात ठेवून रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक केली गेली आहे त्याच बरोबर तालुक्यात उन्हाळा सालभर वनपरीक्षेत्र अधिकारी बिलोली देगलूर यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागात वृक्षाची वाट लागली असताना या विभागा कडून कार्यवाह्या करण्यात आल्या नसल्याचे समजते

