Header Ads Widget

नांदेड पोलीस दलासह कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा


नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार -:- 

नांदेड जिल्हा पोलीस दलासह कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या कडून महत्वाचे आवाहन करण्यात येत आहे की सध्याच्या परिस्थितीत फेसबुक, मॅसेजर व्हाट्सअपवर अनोळखी महिला अनोळखी नंबर वरून प्रथम मॅसेज येत असल्यामुळे त्या मॅसेज मध्ये प्रथम चॅटिंग करत असताना ही, हॅलो, हाऊ, आर,यु,असे मॅसेज करत आहेत त्यानंतर व्हिडीओ कॉल करण्यासाठी सांगतात आणि सदरच्या व्हिडीओ कॉल मध्ये ती महिला स्वतःचे कपडे उतारते किंवा समोरच्या व्यक्तीला कपडे काढण्यासाठी सांगते आणि त्यानंतर ती व्हिडीओ कॉल मध्ये ती महिला अश्लील चाळे करन्यास सुरुवात करते आणि व्हिडीओ तयार करून सर्व प्रकार करत असताना त्यांची रेकॉर्डिंग केली जाते आहे

नांदेड पोलीस दलासह कंधार पोलीसाच्या वतीने अतिशय महत्वाची सूचना व इशारा देण्यात येत असून सदरच्या महिला पासून सावधान राहणाण्याचे आवाहन कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनी नागरिकांना केले अशा पद्धतीने नायगाव पोलीस ठाण्यात कराव्यावर असताना असाच इशारा दिला जात होता 

कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनी ठाण्याच्या वतीने इशारा दिला आहे

नायगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनी सदरच्या ठाण्यात कार्यरत असताना अशाच पद्धतीने नागरिकाची खबरदारी घेत होते आणि सध्या कंधार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आर आर एस पडवळ यांनी नांदेड पोलीस दलासह ठाण्याच्या अतिशय नागरिक दक्ष राहण्यासाठी महत्वाची सूचना जारी केली असून सदरच्या अनोळखी महिला ह्या व्हिडीओ तयार करून मोबाईलवर पाठवला जातो अशा महिला पासून सावधान राहण्याची गरज असून आणि सदरच्या महिला आपले जवळचे नातेवाईक मित्र यांना पाठवणार नाही असे सांगतात आणि पैशाची मागणी करीत असतात सदरचा व्हिडीओ शोशीयल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत असल्यामुळे सर्व नागरिकांनी गाफिल न राहता दक्ष राहावे असे सांगण्यात आले आहे