Header Ads Widget

नायगाव तालुक्यात संततधार व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत,शेतात, घरात,गावात पाणी शिरले,हजारो हेकटर जमीन पाण्याखाली हंगरगा शिवारात मनार कालवा फुटून शेती वाहून गेली





नायागांव : बाळासाहेब पांडे : 

नायगाव तालुक्यात सततधार व मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेक घरात,गावात व शेतात पाणी शिरले, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.प्रशासनाची यंत्रणा सज्ज असली तरी पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने शेतकरी राजा चिंतातुर,तर राजकीय मंडळी राज्याच्या राजकारणा विषयी आतुर दिसत आहेत.यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे नायगाव तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने कापूस. सोयाबीन मुग आणि उडीदाची  पिके उबळुन जाण्याच्या मार्गावर आहेत तर सुजलेगाव हंगरगा शिवारात मनार धरणाचा कालवा फुटून शेतच वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे
तालुक्यासह परिसरात सुरु असलेल्या संततधार सुरूच असून या पावसाने परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भीज पावसाने जमिनीला खडा फुटला असून शेतात जमा झालेल्या पाण्याने कापूस, सोयाबीन, ज्वारीसह इतर पिके उबळून जाण्याच्या मार्गावर  असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकूणच पाणीच पाणी चोहीकडे गेली पिके कुणीकडे अशी स्थिती नायगाव तालुक्याची झाली आहे.
 
 सतत धार व मुसळधार पावसामुळे पुलावरुन पाणी जावुन अनेक गावांत आजू बाजूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेला पाऊस थांबला नाही तर सोयाबीन, कापूस, मुग, उडीद व इतर पिके उबळुन जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.मानारचा कालवा फुटल्याने सुजलेगावच्या  सजन बंधूंचे शेत गेले वाहून हंगरगा शिवारातील शेतकरी सज्जन बंधूंचे शेत बारूळ धरणाच्या मनार कालवा फुटल्याने पूर्णता वाहून गेले आहे.शेतातील पीक व फळ लागवड वाहून गेली असून प्रचंड नुकसान झाले आहे भिमराव मारोती सज्जन,भास्कर भीमराव सज्जन,शंकर मारुती सज्जन,दिगांबर मारुती सज्जन,हे मूळ राहणार सुजलेगाव येथील यांची शेती हंगरगा गट क्र.154 व 156 मध्ये असून या गटातील या सर्व व्यक्तीचे शेतातील गाळ 9 ते 10 फूट वाहून गेली आहे व झाड वगैरे बरेच काही फळबाग नुकसान  झाले आहे...यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.