नगर पंचायत कडून शहरातील
घराच्या पडझडीचा आढावा..
हिमायतनगर नागोराव शिंदे
तालुक्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलचे तहसिलदार डी एन गायकवाड यांच्या सह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांनी शहरातील घराच्या पड झडीची घटना स्थळी जाऊन पाहणी केली व नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान तहसिलदार यांच्या कडून करण्यात आले आहे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी सतत चार दिवसापासुन वाहत आहे त्यामुळे पळसपुर , डोलारि ढाणकी ,बोरी, घारापुर, कोठा तांडा, आंदेगाव, टेंभी, खैरगाव ,वडगाव (ज)दिघि टेंभुर्णी विरसणी कामारि पिंपरी सिरपलि शेलोडा या मार्गा वरील नदी नाल्याना पुर आल्याने येथील पुलावरून पाणी वाहत आहे
त्यामुळे हिमायतनगरशी ह्या गावांचा संपर्क तुटून येथील दळणवळन वहातुक दोन दिवसांपासून ठप्प झाली असल्याचे पहायला मिळत आहे ह्याची पाहणी करण्यासाठी महसूल प्रशासनाचे तहसिलदार हे स्वतः घटना स्थळी जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करत असल्याचे दिसून येत आहे व हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी जागो जागी जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेण्याचे आव्हान केले आहे तर हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसनर यांनी तालुक्यातील जनतेस आव्हान केले की विनाकारण घरा बाहेर पडून पूर सदृश्य ठिकाणी विनाकारण जिवावर बेतनारे कृत्य करू नये असे आव्हान सुधा त्यांनी केले आहे व नगर पंचायतचे मुख्यअधिकारी शामकांत जाधव यांनी शहरातील जनतेस असे आव्हान केले
मुसळधार पावसाच्या पाण्याने कुणाच्या घराची पडझड झाली असेल तर त्यांनी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांना कळवावे असे सांगितले त्यामुळे तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आप आपल्या स्थरावर पूर सदृश्य परिस्थितीची पाहणी करत असल्याचे दिसून येत आहे व हिमायतनगर महसूल प्रशासना कडून तालुक्यातील नागरिकांना ह्या अतिवृष्टी काळात सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या कडून शिवसैनिकाना आव्हान हदगाव हिमायतनगर मतदार संघातील सर्व शिवसैनिकाना आव्हान करण्यात येते की सध्यां बहुतांश गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शिवसैनिकाना विनंती आहे की जमेल तेवढी जास्तीत जास्त मदत करा शिवसेना हे पहिले पासूनच 80% समाजकारण व 20% राजकारण करत असते त्यामुळे सर्व शिवसेनेच्या अधिकारी व पदाधिकारी यांना विनंती आहे की जास्तीत जास्त ठिकाणी पोहचून पूरग्रस्त भागातील नागरिकांनी मदत करा असे आव्हान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे
