Header Ads Widget

नायगाव तहसीलदार यांची बरबडा

येथे पुर परिस्थिती साठी भेट



बरबडा :-प्रतिनिधी 

 बरबडा येथे आठ दिवसापासून पाऊसाने थैमान घालून जन सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.दोन वेळस गावाजवळ पुराचे पाणी येऊन गेले. यावेळेस बरबडा येथील मारुती मंदिरा जवळ पुराचे पाणी आल्याने पुराचा धोका निर्माण होत असल्यामुळे नायगाव येथील तहसीलदार गजानन शिंदे यांच्या सह बरबड्याचे सरपंच माधव कोलगाणे, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले, पोलिस पाटिल प्रतिनिधी संजय कानगुले,  ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी बाबु इंद्रवाड, गंगाधर रुद्रवाड, शिवाजी पा. पचलिंग, बालाजी घोसलवाड, व्यंकटी जेटेवाड, संजय पा. पचलिंग, बाळू गडपे, गंगाधर एडके, बाबु रुद्रवाड, राजु रेगुडे, संगणक परिचालक किरण हनमंते, आनंदा पोतनवार, बाबु शिंगेवाड, या सर्वांनी पुराची पाहणी केली.सध्याची परिस्थिती भयानक असल्यामुळे नागरिकांना अलर्ट राहण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले.