Header Ads Widget

कृषी महाविद्यालय नायगाव रावे

विद्यार्थ्यांच्या वतीने लालवंडी येथे

कृषी दिन उत्साहात साजरा 

बाळासाहेब पांडे विशेष नायगाव प्रतिनिधी 

 कृषी महाविद्यालय नायगावच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी-औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत  मोजै लालवंडी, येथे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात दरवर्षी एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. तसेच यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आपल्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे,
याचे औचित्य साधुन वसंत रोपवाटिका, व कृषी महाविद्यालय नायगाव च्या वतीने विविध प्रकारची फळझाडे व शोभिवंत रोपे गावामध्ये वृक्षारोपणासाठी रावे विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आली विद्यार्थ्यांच्या
वतीने गावामध्ये  वृक्ष दिंडी  वृक्षारोपण, शेतकऱ्यांना फळझाडे रोपे वाटप  विद्यार्थांना खाऊ वाटप कार्यक्रम, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच,श्युवराज अशोक लालवंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व जि. प. प्राथमिक शाळा लालवंडीचे शिक्षक व इतर कर्मचारी तसेच बाकी शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ,शुभम माने, स्नेहांशू मोहोड, सचिन राठोड , रवी शिंदे , सुशील पाटील , सुधन मरे , जयदीप पाटील , गुरुनाथ रेड्डी , मयूर रेड्डी , विशाल पाटील , विकास मेटकर , कल्याण मटपती, किरण नंदगावे, शाहरुख खान, राजू रेड्डी , नरेश पांचिरी,सूर्या मनिराजू, सोहम पटने,गोपाळ नाइके या सर्व कृषी दूतांनी अथक परिश्रम घेतले. 
तसेच सदरील कार्यक्रम  डॉ. डी. एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता (कृषि ) वनामकृवि, परभणी,  डॉ. आर. पी. कदम, विभागप्रमुख, विस्तार शिक्षण विभाग,  कृषि महाविद्यालय परभणी, डॉ. पी के राठोड, विद्यापीठ प्रतिनिधी,  एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव श्री रविंद्र वसंतराव चव्हाण, संचालक श्री रमेश लव्हेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश नादरे, रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सहदेव कुवरदादरा विषय तज्ञ प्रा. संभाजी तळणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.या कार्यक्रमाला डॉ. प्रा.माधवी भालाधरे हार्टीक्लचर विभाग, तसेच राष्ट्रीय सेवा योजना डॉ. गणेश कदम उपस्थित होते.