बाळासाहेब पांडे नायगाव विशेष प्रतिनिधी
उजवल भारताच्या भवितव्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या गावची सुरक्षा करण्या साठी तरुणांनी पुढाकार घेत रात्रीच्या वेळी गुन्हा घडू नये या साठी दक्ष राहून गस्तीचे राष्ट्रीय कार्य "ग्राम सुरक्षा दल" पोलीस मित्र या मोहिमेत सहभागी होऊन ग्रामसेवेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन बिलोली विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले ते कोलंबी तालुका नायगाव येथे नायगाव पोलिस ठाणे याच्या पुढाकारातून आयोजित ग्राम सुरक्षा दल यांची स्थापना व त्यांना लागणारे टी शर्ट सह इतर आवश्यक साहित्य वाटप कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, पोलिसांनी व जनतेनी मिळून गुन्हेगारीला आळा घालण्या साठी प्रयत्न केल्यास जनतेची अडचण दूर होते व सुखाचा श्वास घेऊ शकते.पोलीस व मानव एकच आहेत व मानवच जनतेचे रक्षक आहेत या मुळे बिलोली उप विभागात प्रत्येक गावागावात ग्राम सुरक्षा दल पोलीस मित्र प्रस्थापित करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे यांना आळा बसावा या उद्देशानेच याची निर्मिती केली असून या साठी प्रथम गाव तीर्थक्षेत्र व बाहेर गावच्या व्यक्तीचा वावर असलेले कोलंबी निवडले या योजनेचा शुभारंभ या निमिताने कोलंबी ग्राम पंचायत कार्यालय सभागृहात करण्यात आला.
या वेळी प्रास्ताविक नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले प्रस्ताविकातून शिंदे ग्रामसुरक्षा दल ची ग्रामीण भागात अवशक्यता व त्याचे महत्व सांगितले .या प्रसंगी विकास चिंतेवाड व इतर 30 तरुण युवकांना टी शर्ट,शिटी,दंड्या,बॅटरी चे वाटप करण्यात आले.अर्चित चांडक साहेब,पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे ,याच्या सह मोहिमेत टी शर्ट मोफत देणारे प्रथम कलेक्शन नायगावचे मद्रेवार सावकार यांचा ही गावकर्यांनी सत्कार केला.कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे,सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद बैस,उपसरपंच ज्ञानोबा गवाले,दादाराव पाटील शिंदे, बाबाराव पा शिंदे,या सह गावातील प्रतिष्टीत पो.हे.कॉ वळगे साहेब,आदीची उपस्थिती होती.
