बरबडा -:- किरण हानमंते
बरबडा :- बरबडा येथे महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार येऊन सत्ता स्थापन करण्यात येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेताच त्या क्षणी बरबडा येथे बसस्टॅण्ड वर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, आनंदोत्सव साजरा केला आहे
यावेळी माधव जंगीलवाड, ज्ञानेश्वर सुरेवाड, रामचंद्र कांबळे, देवानंद घोसलवाड यांच्या सहित भाजपा कार्यकर्त्याने आनंदोत्सव साजरा केला.
याठिकाणी भाजपाचे नायगाव तालुकाउपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत चे सदस्य बालाजी मलकाजी घोसलवाड यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बालाजी घोसलवाड यांनी नायगाव चे भाजपा प्रणित रिपाई आठवले गटाचे आमदार राजेश पवार यांना मंत्रीपद मिळणार असल्याची आशा व्यक्त करून दाखवली. जर मंत्री पद मिळाल तर या भागाचा विकास होणार असल्याचे सांगण्यात आले.
