Header Ads Widget

घुंगराळ्यात घराची पडझड पंचनामे करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्या कडून पाहणी वीस ते पंचवीस घराचा रस्ता बंद ग्रामपंचायत कार्यालयानी रस्ता मोकळा करावा मागणी


      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने अनेकांच्या घराची पडझड होऊन घराचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी शासनाच्या आदेशानुसार घरपडीचे पंचनामे करण्यासाठी प्रथम प्राथमिक पाहणी करीत आहेत घुंगराळा गावचे ग्रामविकास अधिकारी हानमंतराव बाबाराव शिंदे यांनी घुंगराळा गावातील काही नागरिकाच्या घराची पावसाने पडझड झाली असल्यामुळे दिनांक १८ जुलै २०२२ रोजी ग्रामविकास अधिकारी पडलेल्या घराची प्राथमिक पाहणी केली असून ग्रामविकास अधिकाऱ्यानी पंचनामा करण्यासाठी विलंब लावू नये असे नागरिकातुन मागणी होत आहे
घुंगराळा गावचे सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधर जोगेवार यांचे प्रतिनिधी महोन जोगेवार यांच्यासह कर्तव्य दक्ष ग्रामविकास अधिकारी हानमंतराव बाबाराव शिंदे यांनी गावांत पडलेल्या घराची प्रार्थमिक पाहणी करत आहेत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी दिनांक १६ जुलै २०२२ रोज शुक्रवारी गावातील घरांची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी शिंदे यांना सांगितले आहे 
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले  माधव विठ्ठलराव पाटील ढगे, मारोती शेषराव पाटील ढगे, भाऊराव तुकाराम पाटील ढगे, यशवंत दौलता पाटील ढगे, शिवाजी सखाराम पाटील शिंदे, बालाजी विठ्ठलराव पाटील ढगे यांच्या घरा समोर घर पडल्यामुळे या रस्त्यावर पंचविस लोकाचा हा रस्ता बंद झाला असल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी लोकांना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी ग्रामपंचायत कार्यालय घुंगराळा यांनी तात्काळ सदर रस्ता सुरळीत करावा असी मागणी होत असली तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे यांनी पावसाने घरे पडलेल्या घराचा लवकरात लवकर पंचनामा करून शासनाकडे आवाहल सादर करावा असी मागणी गावकरी करीत आहे