Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात कृष्णूर येथे नूतन पोलीस स्टेशनला मान्यता मिळाली "अन " ती हवेतच विरली कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि मुगळीकर यांनी गावे जोडणीसाठी प्रस्ताव पाठविला ? होता



       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व नांदेड ते हैद्राबाद राज्य महा मार्गांवर असलेल्या कृष्णूर अद्योगिक वसाहती अंतर्गत मोठ मोठाले उदयोग धंदे करण्यासाठी नामांकित कंपन्या हुभारण्यात आल्या परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात कृष्णूर येते नूतन पोलीस स्टेशन निर्मितीसाठी मोठा गाजावाजा करण्यात आल्यामुळे ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक वसंतराव मुगळीकर यांनी सदरच्या पोलीस ठाण्याला गावे जोडण्यासाठी तसा प्रस्ताव दिला ? असल्याचे समजते आहे
तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत गेल्या चौदा वर्षाखाली नूतन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यासाठीमोठा गाजावाजा करण्यात आला होता परंतु आध्याप कोणत्या ही राजकीय नेत्यानी अथवा आमदार खासदारानी नूतन पोलीस ठाणे हुभारणीसाठी लक्ष दिले नसल्यामुळे नूतन पोलीस ठाणे कागदावरच दिसून येत असल्याने कृष्णूरच्या नूतन पोलीस ठाण्याच्या हुभारणीसाठी राजकीय पुढाऱ्यासह शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ही जनतेतून बोलल्या जात आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उद्योग मंत्री असताना कृष्णूर एम आय डी सी ची निर्मिती केले आणि या भागातील गोरगरीब लोकांना मोठा रोजगार मिळावा म्हणून सदरची निर्मिती केली उद्योग धंदे करण्यासाठी कंपन्या भरभराटीने हुभारल्या गेल्या आणि लोकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राजकीय नेते मंडळीसह प्रशासनाने कृष्णूर येथे नूतन पोलीस स्टेशनची निर्मिती केली असल्याचा मोठा गलबला करण्यात आला परंतु सदरच्या पोलीस ठाण्याच्या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी कोणी ही धजावत नसल्यामुळे बोलाचा भात आणि बोलाचीच कड्डी म्हण्याची वेळ या भागातील जनतेवर आली आहे