Header Ads Widget

महोदय गडकरी साहेब नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गाकडे लक्ष देतील का ! के.टी कंट्रक्शनसह सा बां विभाग अधिकाऱ्यानी घुंगराळा येथे नाली केली नसल्यामुळे पावसाच्या पाण्याने गाळ आला रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता ? -


       माधव पवार 
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या मौजे घुंगराळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तर के टी कंट्रक्शन यांच्या सांगनमतांने रस्याच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम केले नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट राज्य महामार्गावरून वाहत असल्यामुळे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावासाने घुंगराळा येथे माती मिश्रित गाळ रोडवर साचला असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारात येत नसल्यामुळे गडकरी साहेबानी या राज्य महामार्गाकडे लक्ष देतील का ? सवाल जनतेननी केला आह


राज्य महामार्गावरच्या रस्त्याच्या बाजूने नालीचे बांधकाम व रस्त्यावर पडलेले खडे बुजविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह के.टी कंट्रक्शन यंत्रनेला धारेवर धरतील का असा सवाल जनतेतून केला जात असला तरी सध्या पाऊस पडत असल्यामुळे प्रवाशाना थांबण्यासाठी घुंगराळा येथे निवारा बांधला नाही अथवा नालीचे बांधकाम करण्यात आले नाही  वळणावर दिशा फलक लावले नसल्यामुळे या राज्य महामार्गावर अनेक वाहन चालकाला  प्राणाला मुखावे लागले आहे 
राज्यमहामार्ग हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्याला हा मार्ग जोडल्यामुळे या मार्गावर रात्रंदिवस मोठया प्रमाणात वाहतूक चालू असते परंतु नायगाव तालुक्यातील मौजे घेऊन घुंगराळा हे गाव तालुक्यात प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी अनेक गावाचा संपर्क येतो आणि याच ठिकाणा वरून इतर राज्यात जावे लागते परंतु सार सार्वजनिक विभागाचे अधिकारी व के टी कंट्रक्शन या राज्य मार्गावर पडलेल्या खड्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत
असा एक प्रकार घुंगराळा गावांतच नायगावा कडून नांदेडकडे जात असताना एका वडाच्या झाडा जवळ गतीरोधक वर मोठ मोठाले खडे पडल्यामुळे मोठी आडचण निर्माण होत असून एखाद्या वेळेस या खड्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे पेशंट घेऊन जाणाऱ्या अंबूल्सला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे वास्तव चित्र असून गंभीर पेशंटला नांदेड येथील शासकीय दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी हाच मार्ग असल्यामुळे रस्त्यावर मोठी अडचण येत असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव व के.टी कंट्रक्शनच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक ठिकाणी राज्य महामार्गाची वाट लागण्याची दाट शक्यता आहे