Header Ads Widget


     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील सर्वच पाझर तलाव मागील संततधार पावासाने तुडुंब भरल्यामुळे तहसील प्रशासनाचे संपूर्ण लक्ष पाझर तलावाकडे असल्याचे नायागांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले असून प्रशासकीय दौरा करून तालुक्यातील सर्वच पाझर तलावाची पाहाणी केली असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले त्याच बरोबर मागील आठवड्यात मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती व शेतकऱ्यांच्या पिकाचे ही अतोनात नुकसान झाली असल्यामुळे थेट बांधावर जाऊन पाहाणी करत शेतकऱ्यांच्या अंनत अडचणी समजावून घेतल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कृष्णुर येथील दोन पाझर तलाव तर रुई बु येथील एक कुंटूरकर शुगर कारखाना येथील एक सावरखेडे येथील मोठे तलाव आणि घुंगराळा येथील एक व अन्य तालुक्यातील पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढली असली तरी कोणत्याच तलावाच्या पाण्याचा नागरिकांना धोका नसल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले याच वर्षी रुई बु येथील पाझर तलावाची उंची व आउट लेट व्यवस्थित काढले असल्यामुळे सदरचे तलाव अगदी सुरक्षित असल्याचे ही सांगत आमचे तहसील प्रशासनाचे लक्ष सर्वच पाझर तलावाच्या पाण्याकडे असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले आहे