Header Ads Widget

बरबडा परीसरात पुन्हा पावसाला सुरुवात मि पुन्हा येईन ची प्रचिती शेतकरी झाला चिंताग्रस्त


नायगाव फास्ट न्यूज : बरबडा  :-



बरबडा परीसरात मागील 8 दिवसापासून पडलेल्या पावसाने आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने सर्वजण परेशानीत आले आहेत.परवापासून थोडी पाण्याने विश्रांती घेतल्याने सर्वांना आधार व मोकळे वाटत होते.परंतु रविवारी पुन्हा अचानक ढग दिसू लागले आणि बघता बघता पावसाला सुरवात झाली. पहिल्याच वेळीचा पाऊस जास्त झाला होता. त्यानेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.आता कुठेतरी नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्यास सुरुवात झाली होती.परंतु मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने, शेतात पुराचे पाणी आल्याने पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात चिखल झाल्याने पाय चिखलात पूर्णपणे जात आहे.
 ती सर्व जमीन चिखलमय झाली होती म्हणून दोन दिवसांनी जमीन हडकल्याने दोन दिवसानंतर पिकांचे पंचनामे करायचे ठरले होते. पाऊस थांबल्याने शेतात साचलेले पाणी आटून शेती कोरडी होण्याच्या मार्गावर होती. अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी आवश्यक ते असणारे सर्व कामे म्हणजे आंतरमशागतीचे कामे, वेगवेगळ्या फवारण्या करणे, खते टाकणे, अशी सर्व कामे शेतकरी करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक रविवारी पुन्हा पावसाने  सुरूवात केल्याने शेतकऱ्यांचा सर्व नियोजन केलेला बेत फसला आहे. अजुन पावसाला सुरवात झाल्याने पंचनामे करायचे अजून लांबणीवर जाणार असल्यामुळे आणि या पावसामुळे या खरीप पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे.
या महागाई च्या काळात महागडे बियाणे शेतात टाकून मोठा लागवड खर्च केल्यानंतर यावर्षी तरी शेतीचे भरपूर उत्पन्न होईल आणि आपल्या वर असणारे कर्ज फेडणार, राहिलेल्या पैशात आपापला घरखर्च, मुला बाळंच्या शिक्षणाचा खर्च आणि वेगवेगळ्या अडचणी सुटतील अशी आशा बाळगून शेतकरी जीवापाड रात्रंदिवस मेहनत करीत होता सर्व प्रश्न सुटतील असे वाटत असताना या पावसाने यंदाचा हंगाम हातचा घातल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या पुढे कुणाचेही काही ना चालेना म्हणून म्हणतात ना "आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचेहि काहीही ना  चालेना" ... म्हटल्याप्रमाणे पावसाने मी पुन्हा येईन.... मी पुन्हा येईन.... असे म्हणत निसर्गाने मात्र शेतकऱ्यांची जणु चेस्टा करीत या पुन्हा येईन ची आठवण करून दिली.पुन्हा एकदा पावसाने सुरूवात केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे आणि पुर्णपणे हवालदिल झाला आहे.