माधव पवार
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे धर्माबाद या राज्य महामार्गाच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे सदरच्या राज्य महामार्गावर असलेल्या विद्युत खांबाची लाईन शिफ्टिंगचे काम चालू असल्यामुळे या कामा वरील तीन तरुणांना जब्बर शॉक लागेल्याने गंभीर जखमी झाले असल्याची घटना दिनांक १८ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सदरची धक्का दायक घटना घडली असल्यामुळे सदरची घटना खाजगी गुत्तेदाराच्या हलगर्जी पणामुळे घडली असल्याची मोठया प्रमाणात चर्चा चालू असली तरी सदरच्या जखमी तरुणाला कुंडलवाडीच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे सांगण्यात आले आहे
तालुक्यातील कुंडवाडी येथील घडलेल्या घटनेचे सदरील घटनेचे सविस्तर व्रत असे की कुंडलवाडी ते धर्माबाद या रोडवरील विद्युत लाईन शिफ्टिंगचे काम गेल्या अनेक दिवसा पासून एका खाजगी गुत्तेदाराच्या माध्यमातून चालू असल्यामुळे सदरचे गुत्तेदार हे धर्माबाद रोडवरील ३३ केव्हीच्या लगत असलेल्या लाईन शिफ्टिंगचे काम करत होते परंतु त्या कामगाराना सदरील विद्युतचा शॉक लागल्यामुळे जखमी असलेले शुभम पांडुरंग घागदे वय २२ वर्ष राहणार लाठी तालुका कंधार,प्रशांत संजय बाबळे वय २० वर्ष राहणार लाठी तालुका कंधार, रुधीर सुधाकर वाघमारे वय २२ वर्ष राहणार पानभोशी तालुका कंधार या तरुणांना शॉक लागल्यामुळे गंभीर रित्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे
प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे यांनी दिली असल्याचे समजते संबंधित घटनेची चौकशी होणे गरजेचे असून जखमी तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी असी मागणी नागरिकांनी केली सदरचा शॉक कशामुळे लागला विद्युत पुरवठा बंद करण्यात आला नव्हता नसेल का बंद करण्यात आला नाही का ? बंद केल्यास तीन मजूराना शॉक का लागला ? हे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याचा गलथान कारभारामुळे ही घटना घडली आहे का ? असे अनेक प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहेत
