. माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नायगाव शहरात मटका चालत असल्याची ऑनलाईन बातमी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून दिनांक ८ जुलै २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आली त्यांची दखल घेत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मटक्यावर धाड मारली असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असल्याचे दिसून आले असून ठाण्याचे पोलीस नाईक साई सांगवीकर यांच्यासह पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे
शहरातील रजा चौक नायगाव जुना मोंढा येथील आरोपी शेख इस्माईल हाजीसाब वय ६० वर्ष राहणार यांच्यावर गुन्हा १०४/२०२२ कलम १२ (अ ) मुंबई जुगार ऑक्ट नुसार नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती साई सांगविकर यांनी दिली सदरची जुगार, मटक्यावर मारलेली धाड ही दिनांक ९ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी मारण्यात आली या धाडीत एक मोबाईल मटका जुगाराचे साहित्य एकूण एक हजार सहाशे ७० नगदी मिळून आले सदरचा रुपयाचा खुलासा कल्याण मीनल नावाचा मटका जुगार खेळतान व खेळविताना आढळून आले आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साई सांगवीकर यांच्या पोलीस कर्मचाऱ्यानी मटका अड्डयावर धाड मारली असल्यामुळे अशाच पद्धतीने कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना धाडी पे धाडी मारत होते सांगवीकर यांनी नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नायगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक. दाचावार यांच्या मार्गदर्शनाखाली.तपास. नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक जी.एस गंधपवार हे पुढील तपास करीत आहेत
