पडल्यामुळे बालाजी कदम यांचा
बुडून मृत्यू सर्वत्र हळहळ व्यक्त
हिमायतनगर / नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रहिवासी असलेले अल्पभूधारक शेतकरी बालाजी किसनराव कदम वय चाळीस वर्षे यांनी दिनांक ५ जुलै २०२२ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतातील गट क्रमांक ३७ मधील विहिरीतपाणी आणण्यासाठी गेला असता त्यांचा पाय घसरल्याने विहीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या संदर्भात नातेवाईकानी हिमायत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे समजते सदरील शेतकरी हा अल्पभूधारक असल्याचे सांगण्यात येत असल्याले तरी त्यांचा दुर्दैवी विहिरीत बुडून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन सदरच्या मयताची नोंद करण्यात आली असल्याचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रहिवासी असलेला शेतकरी हा शेतात फवारणी करण्यासाठी पाण्याची आवश्यता असल्यामुळे विहिरीत उत्तरत असताना त्यांच्या तोल ( पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला असल्यामुळे घरातील एक कुटुंब प्रमुखाला जीव गमवावा लागली असल्याची घटना घडली असून त्यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुले एक मुलगी भाऊ असा परिवार असून पळसपुर त्याच्या गावावर सदरच्या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली असून या संदर्भात घटनेची पाहणी करण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली के बि कांगने मॅडम पंचनामा करीत असल्याची माहिती हिमायतनगर ठाणे
अंमलदार हेमंत चौले यांनी माहिती दिली असून सदरील घटनेची संदीप किशनराव कदम यांनी ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी सदरील मयताचे प्रेत शेवविच्छेदनासाठी हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले --मयत बालाजी किशनराव कदम ह्या सदरील शेतकऱ्यावर रात्री उशीरा त्यांच्या गावी अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे समजते आहे
