नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील तेगंगणा भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या २२२ वर प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांनी सोनारी ते सावरगाव मेट तालुका भोकर जिल्हा नांदेड दरम्यान अनधिकृतपणे चेक नाका उभारला असल्याने सदरच्या अधिकाऱ्यानी वाहन तपासनीच्या नावाखाली वाहन धारकाची मोठी लूट करीत असल्याची तक्रार राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय कुमार पाटील मोरे यांनी नुकतीच केली असून सदरचा चेक नाका अनधिकृत पणे उभारण्यात आला असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदरची तक्रार उप विभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे
नांदेडच्या परिवहन विभाग नांदेडच्या अधिकाऱ्यानी अनधिकृत तपासणी नाका उभा केल्याचा आरोप ही निवेदनात केला असून सदरच्या होत असलेल्या वाहन धारकाची बाजू लक्षात घेऊन चौकशी करणे आवश्यक असल्याचे जनसामान्य माणसासह तक्रार कर्त्यांचे म्हणे आहे सदरचा अनधिकृत चेक नाका कायम स्वरूपात बंद करण्यात अशा अशियाचे निवेदन राज्याच्या एकाच नावाच्या दोन मंत्र्याला निवेदन देऊन कळविण्यात आले आहे सदरचे निवेदन कर्ते राष्टीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय कुमार पाटील मोरे प्रादेशिक अधिकाऱ्याच्या ( आर टी ओ ) यांच्या विरोधात केली असून काही महिन्यापूर्वी सदरचा नाका अनधिकृत असल्याचे तपासणी अंती सदरील नाका जमिनी उद्धवस्त करण्यात आला असल्याचे निवेदन कर्त्यांनी निवेदन दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे -
