नायगाव / मधुकर जवळे
नायगाव पंचायत समितीच्या माध्यमातून व उमेद अभियान तालुका व्यस्थापक अमोल जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी.विश्रांती धडेकर यांनी स्वयं सहाय्यता समूह तयार करण्यासाठी गावातील महिलांच्या मीटिंग घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचे सखोल असे मार्गदर्शन करून धनंज येथील ११० महिलांना एकत्र करून ११ स्वंयसहाय्यता समूह स्थापन केले आहे.
महिलांनी कोणत्याही व्यवसायाला किरकोळ न समजता आपण कोणता व्यवसाय करावा माणसे कसे जोडून घेऊ शकतो हे पाहावे. असे अनेक उदाहरणं देऊन सर्व सहभागी माहीला सदस्यांना सीआरपी.विश्रांती धडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वयं सहाय्यता समूहाच्या महिलांना प्रेरित करून अकरा स्वयं सहाय्यता गट तयार केले आहे, त्यामुळे महिलांना आर्थिक दृष्टया बळ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान चे नायगाव तालुका व्यवस्थापक अमोल जोंधळे व राज्य अभियान व्यवस्थापक श्री रामदास धुमाळे वर्षा ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभियान संचालक , संजय तुबाकले अभियान सहसंचालक , जिल्हा व्यवस्थापक गजानन पातेवार , द्वारकादास राठोड , धनंजय भिसे गणेश कवडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात माझ्या गावातील प्रत्येक स्वयं सहाय्यता गट आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागातल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज ओळखून व्यवसाय निवडून रोजगार निर्मिती करून देणार असल्याचा विश्वास सीआरपी विश्रांती धडेकर यांनी दिला आहे,
