Header Ads Widget

भोकर तालुक्यातील तेलंगणा भोकर राष्ट्रीय महामार्गावर वाहन तपासणीच्या नावाखाली वाहन धारकाची आर टी ओ लूट करत असल्याची तहसीलदाराच्या मार्फत उपविभागीय अधिकाऱ्याला तक्रार


नायगाव फास्ट न्यूज - माधव पवार -

भोकर तालुक्यातील तेगंगणा जोडलेल्या भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या २२२ वर प्रादेशिक परिवहन कार्यलय आर टी ओ यांनी सोनारी ते सावरगाव मेट तालुका भोकर जिल्हा नांदेड दरम्यान अनधिकृतपणेचेक नाका उभारण्यात आला असल्याने सदरच्या अधिकाऱ्यानी  वाहन तपासनीच्या नावाखाली वाहन धारकाची आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीपकुमार दत्तात्रय गंगासागरे यांनी भोकरच्या तहसीलदारा मार्फत उपविभागीय अधिकाऱ्याना दिनांक २२ जून २०२२ रोजी निवेदन देऊन कळविले आहे
संबंधित परिवहन विभाग नांदेड यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अनधिकृत तपासणी नाका उभा केला त्यांची सविस्तर चौकशी करून सदरील तपासणी नाका कायमचा बंद करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी आणि जनसामान्य वाहन धारकाला न्याय मिळवून द्यावेत अशी मागणी संदीपकुमार गंगासागरे यांनी भोकरच्या तहसीलदारां मार्फत उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कळविले आहे 
भोकर ते तेलंगणा महामार्गावर गेल्या वीस वर्षाखाली अनधिकृतपणे चेक नाका उभारून अधिकाऱ्याच्या कडून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप केला जात असून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी ते सावरगाव यांच्या मध्यभागी सदरच्या नाक्याची निर्मिती करण्यात आली परंतु प्रादेशिक विभागाचे अधिकारी अनधिकृतपणे तपासणी करण्याच्या नावाखाली कापडी तंबू उभारून चेक पोस्ट तपासणी नाका तयार करण्यात आला असला तरी काही महिन्यापूर्वी सदरचा नाका अनधिकृत असल्याचे तपासणी अंती सदरील नाका जमिनी उद्धवस्त करण्यात आला असल्याचे निवेदन कर्त्यांनी निवेदन दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे