Header Ads Widget

शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नायगांव (बा) येथील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश नांगरे सेवानिवृत्त !!


 नायगांव  / मधुकर जवळे -:- 
शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नायगांव (बा) येथील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.पी . वाय.नांगरे हे 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. वसंतराव पाटील चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. वसंतराव पाटील चव्हाण यांनी त्यांच्या शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला .त्यांना व त्यांच्या कुटुंबीयास भावी कार्यास,भावी जीवनास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ.दत्तात्रेय खंदारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरिबाबू , कार्यक्रम संचालन कर्ते डॉ. गोविंद परडे यांनी प्रा. डॉ. पी. वाय.नांगरे सरांच्या शैक्षणिक व इतर मोलाच्या कार्यावर विचार व्यक्त केले.

 त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी शैक्षणिक कार्य केले. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, तसेच व्यापार, व्यवहार,सेवा क्षेत्रात अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. प्रा.डॉ.पी वाय नांगरे यांनी संस्थेच्या तसेच महाविद्यालयाच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण, संस्थेचे जेष्ठ संचालक मा. केशवराव पाटील चव्हाण, मा. माधवराव ईश्वरराव बेळगे आप्पा, माननीय सुरेश पाटील कल्याण, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. गोविंद मेथे, उपप्राचार्य डॉ. एस.एस.पाटील, प्राचार्य के.जी. सूर्यवंशी ,माजी प्राचार्य डॉ. बालासाहेब इंगळे, प्राचार्य डॉ.बी.जी.गायकवाड , प्राचार्य डॉ रमेश कदम, प्राचार्य डॉ. माने डॉ.शंकर गड्डमवार ,प्राचार्य डॉ.  क्षीरसागर, ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ.बी.आर.लोकलवार,मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, डॉ.राजीव कदम, श्री राहुल मगर उपस्थित होते.

 या कार्यक्रमासाठी बाहेरील इतर महाविद्यालयातील  प्रा जांभरुणकर, प्रा गावी जाधव, डॉ.डी एन मोरे डॉ.सूर्यकांत जोगदंड डॉ.एन बी जाधव डॉ.संजय पाटील डॉ.सुधीर टाले डॉ.पंडितराव सोनाळे डॉ. नारखेडे डॉ.माने डॉ. सतीश कुंडलवाड डॉ. ढेंबरे डॉ. आवाडे डॉ. डाकोरे प्राध्यापक मंडळी तसेच शरदचंद्र महाविद्यालयातील  कार्यालय अधीक्षक श्री प्रशांत बिलोनीकर ,स्टाफ सेक्रेटरी प्रो.डॉ.बी.जे.वाघमारे, माजी प्रा.एस.व्ही. वीरभद्रे, सुभाषराव कल्याण,प्रा.डॉ.वट्टमवार ,डॉ.सानप डॉ.सिद्दिकी, डॉ.सौ. शकुंतला शिंदे, सौ.राजश्री मॅडम डॉ. सौ. वाडेकर, डॉ सौ.पांगरकर, डॉ. अंजनीकर, डॉ.संजय भालेराव, श्री उमेश चव्हाण, श्री संदीप बकवाड, श्री विश्वनाथ बेळगे, श्री मोहिते,श्री पांचाळ,श्री कावडे, श्री पुट्टेवाड, श्री भालेराव, श्री प्रशांत मोरे,  महाविद्यालयातील सी एच बी प्राध्यापकवर्ग ,कर्मचारी, जनता हायस्कूल मधील शिक्षक वर्ग तसेच शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक  क्षेत्रातील अनेक मान्यवर मित्रमंडळी, नांगरे सरांचे कुटुंबीय,विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी प्रा. डॉ. राजेश रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.