Header Ads Widget

उमरीच्या कोर्टातुन आरोपी पळाल्याने आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक - पोलीस निरीक्षक भोसले यांची माहिती


          माधव पवार 
उमरी न्यायालयातून तीन आरोपींना बाहेर घेऊन जात असतांना पोलीसांना झटका ? देऊन शिक्षा झाल्या नंतर तीन आरोपी पळून गेले असल्याची चर्चा होत जिल्हाभर रंगली असली तरी आरोपी कोर्टातुन पळाला पोलिसांच्या हातून नाही किंवा झटका देऊन नाही असी ही चर्चा होताना ऐकावंयास मिळत आहे या आरोपींच्या शोधासाठी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महोनराव भोसले यांनी तात्काळ पथक नेमविले असून या पथकात एक अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याची पोलीस निरीक्षक भोसले यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना दिली संदर्भात उमरी पोलीस आपले चोक पणे कर्तव्य बजावत असून आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे उमरी पोलिसांनी सांगितले आहे
शिक्षा झालेले आरोपी कोर्टातुन पळाले पोलिसाच्या हातून नाही ---- उमरी पोलीस ठाण्यात दिनांक ३ जुलै २०२२ रोजी कोर्टातुन पळून गेलेल्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कोल्हा येथील हाणामारी प्रकरणातीन आरोपी अविनाश क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर आणि रमेश क्षीरसागर यांना बेडया ठोकण्यासाठी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महोनराव भोसले यांनी पथक तयार केले व पुढील तपास पोनि भोसले हे करीत आहेत
उमरी तालुक्यातील कोल्हा येथील रहिवासी असलेले व सन २०१२ साली मध्ये कोल्हा तालुका उमरी येथे झालेल्या एका हाणामारी प्रकरणातील आरोपीला उमरी येथील न्यायाधीश ए.बी. रेडेकर यांनी दिनांक एक जुलै रोजी २०२२ दुपारी आरोपी अविनाश निवृत्ती क्षिरसागर, प्रकाश रमेश क्षीरसागर आणि रमेश माणिका क्षीरसागर या तिघांना दोषी ठरवून कोर्टाने त्यांना तीन वर्ष शिक्षा आणि प्रत्येकास ३५  हजार रुपये रोख दंड असा एकूण एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होतीसदरच्या दंडाची रक्कम भरल्याच्या नंतर तीन वर्षाची शिक्षा अपील अवधीसाठी स्थगित केली जात असते  आम्ही एक लाख पाच हजार रुपये भरतो असे तिन्ही आरोपींनी कोर्टाला सांगितले होते